बुधवार, २५ मे, २०१६

पुनरुत्पादन बालआरोग्य कार्यक्रम

४.५.३  पुनरुत्पादन बालआरोग्य कार्यक्रम 

* पुनरुत्पादन व बालआरोग्य कार्यक्रम याची सुरवात १ एप्रिल २००५ रोजी ५ वर्षासाठी लागू करण्यात आला.

* त्याचे प्रमुख उदिष्ट लोकसंख्या स्थिर करण्यासाठी प्रसूती, अर्भक मृत्यू, विकृतीचे प्रमाण कमी करणे. व अनैच्छिक गर्भधारणा कमी करणे यासाठी प्रयत्न केले जातात.

* हा कार्यक्रम अस्तित्वातील इतर संबधित कार्यक्रमाचा मिळून बनलेला असून त्याद्वारे गरिबांच्या गरजा भागविण्यासाठी खास लक्ष दिले जाणार आहे.

* या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशाला आपापल्या परिस्थितीशी अनुरूप असा अंमलबजावणी आराखडा तयार करावा लागणार आहे.

४.५.४ सार्वत्रिक रोग सुरक्षा कार्यक्रम 

* या कार्यक्रमांतर्गत अर्भकांना व गर्भवती महिलांना लासी दिल्या जातात. जेणेकरून लसिमार्फात प्रतिबंध  करता येणारे आजार नियंत्रणात आणता येतील.

* हा कार्यक्रम सर्वप्रथम १९८५ साली शहरी भागात लागू करण्यात आला. सन १९८८ ते २००५ दरम्यान घटसर्पाच्या प्रमाणात ४०% नी घट झाली आहे.

* गोवर आजाराच्या प्रमाणात ६६% तर अर्भकावस्थेत धनुर्वाताच्या प्रमाणात ९२% व पोलिओच्या प्रमाणात ९९% नी घट झालेली आहेत.

राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम 

* CDOTS च्या मदतीने हा कार्यक्रम राबविला जात आहे. १९९७ सालापासून लागू करण्यात आला असून मार्च २००६ पर्यंत संपूर्ण देश यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

* आतापर्यंत या कार्यक्रमांतर्गत ६५ लाखापेक्षा जास्त रुग्णावर DOTS च्या सहाय्याने इलाज करण्यात आला आहे.

राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम 

* एडस बाधित लोकांची दिवसेंदिवस संख्या वाढत असून त्याचे नियंत्रण आवश्यक आहे. २००५ साली HIV ची संख्या ५.२ दशलक्ष होती व या संसर्गाचे प्रमुख कारण  असुरक्षित शरीरसंबध हे होते.

* या उपक्रमाचा पहिला टप्पा १९९२ साली लागू करण्यात आला.

* या कार्यक्रमांतर्गत लोकसंख्येसाठी अतिधोक्ता हस्तक्षेप करून प्रतिबंध व सर्वसाधारण लोकसंख्येसाठी प्रतिबंधात्मक हस्तक्षेप, एड्स बाधित लोकांना कमी खर्चात वैद्यकीय सुविधा व संस्थात्मक बळकटीकरण आणि आंतर क्षेत्रीय सहकार्य आवश्यक.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.