शनिवार, २८ मे, २०१६

जमीन विभाजन तुकडीकरण\कारणे

जमीन विभाजन तुकडीकरण आणि शेतजमिनीचे एकत्रीकरण 

* महाराष्ट्रात शेतीच्या कमी उत्पादकतेस जे अनेक घटक जबाबदार आहेत त्यापैकी एक महत्वाचा घटक शेतजमिनीचा लहान आकार हा आहे.

* शेतजमिनीच्या लहान आकारामुळेच शेती बिनकिफायतशीर बनते. वाढती लोकसंख्या आणि शेतजमिनीचे मर्यादित स्वरूप यातूनच विभाजन व तुकडीकरणाची समस्या निर्माण होते.

जमीन विभाजनाचे व तुकडीकरणाचे कारणे 

* वारसा हक्काचे कायदे - वारसा हक्काच्या कायद्यामुळे वारसदारांना त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत समान हिस्सा मिळतो. हिंदू कायद्यानुसार मुलांबरोबरच मुलीनाही वडिलोपार्जित मालमत्तेत समान हिस्सा प्राप्त होतो.

* संयुक्त कुटुंबपद्धतीचा ऱ्हास - नागरीकरण, शिक्षणाचा प्रसार, पाश्चतांचे अनुकरण, औद्योगिकीकरण इत्यादीमुळे एकत्रकुटुंब पद्धतीचा पाया उध्वस्त झाला.

* वाढती लोकसंख्या - वाढती लोकसंख्या व शेतजमिनीचा मर्यादित पुरवठा यामुळे शेतजमिनीवरील भार वाढत आहे.

* शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा - शेतीव्यवसायातील अनिश्चिता, सावकारांचे भयानक आजार, यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो.

* कुटिरोद्योगांचा ऱ्हास - यांत्रिकीकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे कुटिरोद्योग यांचा ऱ्हास झाला.

* जमिनीच्या मालकीबाबतची प्रतिष्ठा - भारतीय समाजव्यवस्थेत शेतजमिनीची मालकी ही एक प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.