शुक्रवार, २० मे, २०१६

शिक्षणाच्या जागतिकीकरणाचे फायदे

२.९.२ शिक्षणाच्या जागतिकीकरणाचे फायदे 

* उत्तम दर्जाचे शिक्षण - जागतिकीकरणाचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम शिक्षण विद्यार्थ्यांना मिळते.

* आधुनिक अभ्यासक्रम - परकीय शिक्षणसंस्था आपले अभ्यासक्रम आधुनिक प्रवाहाशी सुसंगत ठेवतात.

* स्पर्धा - परकीय शिक्षण संस्थांच्या स्पर्धेचा फायदा विद्यार्थ्यांना मिळतो.

* नोकरीची हमी - नव्या अभ्यासक्रमाबरोबर नव्या कौशल्याची  बाजारपेठेनुसार पुरवठा करण्याचा प्रयत्न परकीय शिक्षण संस्था करतात.

* आधुनिक तंत्र - शिक्षण देण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर केला जातो.

* विविध देशांचा अनुभव व सरकारी खर्चात कपात करता येते.

२.९.३ शिक्षणाच्या जागतिकीकरणाचे तोटे 

* शिक्षण एक वस्तू - शिक्षण ही बाजारू वस्तू किंवा इतर वस्तूप्रमाणे व्यापारी वस्तू झाली हा जागतिकीकरणाचा महत्वाचा
अनिष्ट परिणाम आहे.

* गुणवत्तेचा प्रश्न - परकीय शिक्षणसंस्थांशी गुणवत्ता तपासणारी यंत्रणा नसल्याने अशा संस्थामध्ये नेमके किती गुणवत्तेचे शिक्षण दिले जाते हा एक प्रश्न निर्माण होतो.

* विषमता - जागतिकीकरणाचा परिणाम म्हणून शैक्षणिक क्षेत्रातही विषमता वाढीस लागली आहे.

* पाच्शातीकारण - शिक्षणाच्या जागतिकीकरणातून पशात्य संस्कृतीचा पगडा वाढला आहे.

* खर्चिक - शिक्षणाच्या जागतिकीकरणातून खर्चामध्ये वाढ करण्याचे ठरले आहे.

* उपलब्धता - शिक्षणाची उपलब्धता ही जागतिकीकरणाने व स्पर्धेने वाढणे अभिप्रेत आहे.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.