मंगळवार, १७ मे, २०१६

प्राथमिक शिक्षणप्रसार व विशेष कार्यक्रम

प्राथमिक शिक्षणप्रसार व विशेष कार्यक्रम 

खडू-फळा मोहीम [ OB - Operation black-board ]

* सन १९८६ च्या धोरणाने शाळेची इमारत, तेथील साधनाचा अभाव यांच्यामुळेच गळतीचे प्रमाण वाढले. 

* शालेय वातावरण उत्साहजनक करण्याच्या भूमिकेतून खडू - फळा मोहीम सन १९८७-८८ पासून सुरु करण्यात आली. 

* या मोहिमेअंतर्गत प्रत्येक शाळेला दोन मोठ्या खोल्या असणारे वर्ग, मुले व मुली यांच्यासाठी स्वतंत्र स्वछतागृह, दोन शिक्षक व त्यापैकी एक शिक्षिका, फळा, नकाशे खेळणी ग्रंथालय अशा आवश्यक अध्ययन सुविधा. 

* या योजनेचा आता विस्तार करण्यात आला आहे, त्यानुसार दोनऐवजी तीन वर्ग व तीन शिक्षक देण्यात येतो. 

* तसेच भाषा, गणित आणि पर्यावरण अभ्यास या शिक्षकांच्या प्रशिक्षणाला महत्व दिले आहे. 

अनौपचारिक शिक्षण [ NFE - Non Formal Education ]

* या योजनेचा मुख्य उद्देश जी मुले विशेषता मुली सामाजिक व आर्थिक कारणाने शाळेत येवू शकत नाहीत त्यांना अनौपचारिक शिक्षणातून शिक्षण प्रवाहात आणणे असा आहे. 

* हि योजना १९७९-८० मध्ये सुरु करण्यात आली व १९८७ साली विस्तारण्यात आली. १९९३ साली संघटन, लवचिकता अभ्यासक्रमाची व्यवहारीकता आणि विद्यार्थ्यांचे वैविध्य यांचा विचार करून बदल करण्यात आला. 

* हि योजना मागासलेली राज्ये म्हणजे आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, ओडीसा, अरुणाचल प्रदेश, या सारख्या राज्यात राबविलेली आहे. सध्या ही २१ राज्यात योजना चालू आहे. 

* या योजनेत अल्पकालीन अभ्यासक्रम, शिकविण्याच्या पद्धतीत लवचिकता व मुलीच्या शिक्षणावर भर ही महत्वाची वैशिष्टये होती. 

किमान अध्ययन पातळी [ MLL - Minimum Level of learning ]

* प्राथमिक  गुणात्मक बाजू सुधारण्यासाठी १९९१ सालापासून भारतानेदेखील किमान अध्ययन कार्यक्रम हाती घेतला आहे. 

* अभ्यासक्रमात पुनर्रचना करण्यात आली आहे. पाठांचा बोजा अभ्यासक्रमातून घटविण्यात आला असून पाठांतरवरिल भर कमी केला आहे. 

* किमान अध्यायन पातळी साध्य होऊन ती मुले पुन्हा निरक्षर पातळीवर येणार नाहीत. याची दक्षता घेणे. 

* अध्ययनातील प्रगती केवळ हुशार विद्यार्थी नव्हे तर सर्वसाधारण विद्यार्थ्यानाही चांगली करता यावी यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. 0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.