रविवार, १५ मे, २०१६

मनुष्यबळ विकासातील शासकीय आणि अशासकीय संस्था

१.६ मनुष्यबळ विकासातील शासकीय आणि अशासकीय संस्था 

१.६.१ राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था [ NCERT ] - १९६१ स्वायत्त संस्था म्हणून NCERT ची स्थापना करण्यात आली. मानवी संसाधन विकास मंत्रालय तसेच केंद्र व राज्यशासनाला शालेय शिक्षणाबाबत सल्ला, मार्गदर्शन देण्याचे कार्य या संस्थेमार्फत केले जाते. शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे हे या संस्थेचे मुख्य उदिष्ट आहे.

[ कार्याचे स्वरूप ] 

* शालेय शिक्षणाची संबधित संशोधनात समन्वय साधून व प्रोत्साहन देणे.

* शिक्षकांचे सेवांतर्गत व सेवपूर्ण प्रशिक्षण करणे.

* नव्या शैक्षणिक पद्धती, तंत्र व प्रयोग यांची माहिती देणे.

* राज्यशिक्षण विभाग, विद्यापीठे व इतर संस्थांशी सहकार्य करणे.

* शैक्षिणिक विभागाच्या संकल्पना, प्रयोग  आदानप्रदान करणे.

* पुस्तके, मासिके, व इतर शैक्षणिक वाचन साहित्य तयार करणे.

* शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणसाठी मुख्य प्रवर्तक म्हणून संस्था म्हणून कार्य करणे.

* विविध देशांच्या शिक्षणसंस्थांची द्विपक्षीय सांस्कृतिक देवाण घेवाण करण्यासाठी तज्ञ यांची भेट घडवून आणणे.

* आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या संस्था, प्रशिक्षणात सहभागी होणे.

[ NCERT च्या सहयोगी संस्था ] 

* राष्ट्रीय शिक्षणसंस्था [ National Institute Of Education ]
* केंदीय शैक्षणिक तंत्रसंस्था [ Central Institute of Educational Technology CIET ]
* पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षणसंस्था [ PSSCIVE ]
* प्रादेशिक शिक्षणसंस्था

संघटनात्मक रचना 

* केंद्रीय मानवी संसाधन विकासमंत्री हे या संस्थेचे पदसिध्द अध्यक्ष असतात.

* यांच्या सदस्यांमध्ये सर्व राज्यांचे शिक्षणमंत्री असतात.

* तसेच यु.जी.सी चे अध्यक्ष, चार विद्यापीठांचे कुलगुरू, इतर शिक्षणसंस्थांचे अध्यक्ष [ राष्ट्रीय स्तरावरील असतात ] कार्यकारी संचालक समिती दैनदिन कार्य पाहते. याच्या १० उपसमित्या असतात.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.