गुरुवार, १२ मे, २०१६

सन २००० चे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण व उदिष्टे

१.२.३ सन २००० चे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण व उदिष्टे 

* सुविधांचा पुरवठा - कुटुंबनियोजन साधने, सुविधांचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करणे आणि माता व बालक यांच्या आरोग्यासाठी सुविधा उपलब्द करून देणे.

* स्थूल फलनदर [ टी. एफ. आर ] घटविणे - स्थूल फलनदरामध्ये पुनरुत्पादनक्षम वयोगटातील स्त्रियांना असणाऱ्या सरासरी मुलांची संख्या अभ्यासली जाते. हा दर १९९७ साली ३.१ होता तो २०१० पर्यंत २.१ असा घटविण्याचे उदिष्ट होते.

* सन २०४५ पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करणे - लोकसंख्या धोरणाचे दीर्घकालीन उदिष्ट हे आपली लोकसंख्या सन २०४५ पर्यंत स्थिर करण्याचे आहे. यानुसार २०१० पर्यंत लोकसंख्या ११६ कोटी वरून ११० कोटीवर आणणे.

* बालमृत्यूदर प्रतीहजारी ७१ आहे तो १९९७ ते २०१० या काळात ४२ पर्यंत आणणे.

* एकूण किंवा स्थूल दर ३.१ वरून २.१ वर आणणे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.