मंगळवार, १० मे, २०१६

१.१ भारतीय लोकसंख्या - सद्यस्थिस्ती

१.१ भारतीय लोकसंख्या - सद्यस्थिस्ती

* देशातील हि लोकसंख्या महत्वाची भूमिका पार पाडत असते. एका बाजूला योग्य प्रमाणात असणारी लोकसंख्या एक महत्वाचे संसाधन ठरते. पण हिच लोकसंख्या जास्त प्रमाणात वाढली कि एक समस्या ठरते. लोकसंख्या हि केवळ संख्यात्मक बाजू असणारी बाब नसून तिच्या गुणात्मक बाजू म्हणजेच शेक्षणिक स्तर आरोग्य या बाबी देखील महत्वाच्या असतात.

१.१.१ भारतीय लोकसंख्येची संख्यात्मक संरचना, आकारमान  व वृद्धीतील कल 

सध्याची लोकसंख्या हि आर्थिक विकासात कशाप्रकारे योगदान देते किंवा भूमिका पार पाडते हे समजण्यासाठी हि बदलाची प्रवृत्ती अभ्यासावी लागते.  

* एकूण लोकसंखेचा आकार आणि त्यात दरवर्षी पडणारी भर फार महत्वाची असते. भारतीय लोकसंख्येचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या आकाराची आणि वाढीचा दर अधिक असणारी लोकसंख्या हे आहे. भारतीय लोकसंख्या सन १९२१ या वर्षापासून सातत्याने वाढत असून हा वाढीचा दर सन १९५१ नंतर म्हणजेच स्वातंत्र्योत्तर काळात अधिक वाढल्याचे दिसते. १९५१ साली भारतीय लोकसंख्या ३६.१ कोटी इतकी होती ती सन २०११ मध्ये १२१ कोटी १ लाख २४ हजार २४८ झाली. सन १९५१ नंतर लोकसंखेच्या वाढीचा दर सरासरी २% राहिला आहे. लोकसंख्येतील वाढ हि प्रामुख्याने जननदर आणि मृत्यूदर यातील फरकावर अवलंबून असते.

* सन १९५१ ते २००१ या काळात जननदराचे प्रमाण दरहजारी ४० ते २५ पर्यंत घटले तर मृत्यूदर दरहजारी २७ होता.  तो ८.४ पर्यंत प्रतिहजार घटला. मृत्यूदरात झालेली घट हि जननदरातील घटीपेक्षा अधिक असल्याने लोकसंखेच्या आकारात मोठी वाढ होत गेल्याचे दिसते. सन १९५१ ते १९७१ या दोन दशकात लोकसंख्या २.५% दराने वाढत होती, सन १९९१ ते २००१ या दशकात वाढीचा दर सन २००१ ते २०११ काळात वाढीचा दर १.६४% असा होता.

* वाढत्या लोकसंख्येची आणखी एक बाजू म्हणजे लोकसंख्येची वाढती घनता होय. दरचौरस कि मी क्षेत्रात सरासरी किती लोक राहतात. यावरून लोकसंख्येची घनता मोजतात. १९५१ साली लोकसंख्येची घनता ११७ होती, तर १९९१ साली २७४ आणि २००१ साली ३२४ झालेली दिसते. इंग्लंड व जपान यांची लोकसंख्येची घनता अनुक्रमे २४७ व २२१ एवढी आहे म्हणून हे देश उच्च प्रगत आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.