शुक्रवार, १३ मे, २०१६

प्रधानमंत्री पिक विमा योजना २०१६

प्रधानमंत्री पिक विमा योजना २०१६

योजनेचे वैशिष्टे 

* प्रधानमंत्री पिक विमा योजना या योजनेंतर्गत भारतीय कृषी विमा कंपनीबरोबरच योजनेत नमूद खाजगी विमा कंपन्याकडून विमा संरक्षण घेण्याची तरतूद.

* योजना क्षेत्र घटक धरून राबविण्यात येईल.

* योजना पिक कापणी पूर्वीचा तपशील उपलब्द असलेल्या सर्व पिकासाठी राबविण्यात येईल.

* योजना कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीची बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐछिक आहे.

* अपरिहार्य कारणासाठी पेरणी न होऊ शकणाऱ्या प्रकरणात विमा संरक्षणाच्या २५% नुकसानभरपाई तत्काळ देण्याची तरतूद.

* कापणी करून वळवणी करण्यात येत असलेल्या पिकाकरीता कापणीनंतर १४ दिवसापर्यंत संरक्षण देय.

* स्थानिक आपत्ती व कापणीनंतरचे नुकसान याकरिता वैयक्तिक पंचनामे करण्याची तरतूद.

* खराब हवामानामुळे सरासरी ५०% पेक्षा कमी उत्पन्न येण्याचा प्राथमिक अंदाज असल्यास विमा संरक्षणाच्या २५% नुकसान भरपाई आगाऊ देय.

[ योजनेमध्ये संरक्षण मिळण्याच्या बाबी ]
आग, वीज पडणे, वादळ, चक्रीवादळ, गारपीट, पूर, भुस्कलन, दुष्काळ, पावसातील खंड, रोग किडीचा प्रादुर्भाव

[ विमा हफ्ता ]

* खरीप पिके - विमा संरक्षित रकमेच्या २%
* रब्बी पिके - विमा संरक्षित रकमेच्या १.५%
* नगदी पिके - विमा संरक्षित रकमेच्या ५%

[ विमा संरक्षण ]

* यापुढील विमा हफ्त्यातील देय रक्कम राज्य शासन व केंद्र शासन यांच्या ५०\५० समप्रमाणात देण्यात येईल.

* बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या प्रकरणात सरासरी उत्पन्नाइतकी रक्कम

[ नुकसानीची निश्चिती ]

* भारतीय कृषी विमा कंपनी अथवा स्वतंत्र पणे नियुक्त करण्यात येणाऱ्या यंत्रणेद्वारे करावयाची आहे.

* राज्यशासनाने यादीतील कंपनीकडून त्यांना पिकाबाबत आवश्यक तपशील उपलब्द करून देवून विमा हफ्ता दर मागवायचे आहेत.

* सहभागी होणाऱ्या विमा कंपनीने अधिसूचित असणाऱ्या सर्व पिकासाठी दर देणे बंधनकारक आहे. अन्यथा सदर कंपनी अपात्र ठरेल.

[ नुकसान भरपाई ]

* जर विमा हफ्ता रकमेच्या ३५० टक्के अथवा विमा संरक्षण विमा कंपनीच्या ३५% टक्के अधिक असेल ती रक्कम विमा कंपनीने द्यावयाची आहे. उर्वरित रक्कम केंद्र व राज्य शासनाने समप्रमाणात द्यावयाची आहे.

* सरासरी उत्पन्न : मागील ७ वर्षातील २ खराब वर्ष वगळून उर्वरित ५ वर्षाचे उत्पन्न धरण्यात यावे.

* उंबरठा उत्पन्न - सरसरी उत्पन्नाच्या ७०\८०\९०


  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.