बुधवार, १८ मे, २०१६

मागासवर्गीय समाजाचे शिक्षण

२.४.३ मागासवर्गीय समाजाचे शिक्षण 

* मागासवर्गीय समाजामध्ये पुढील उपवर्ग आहेत अनुसूचित किंवा वर्गीकृत जाती, अनुसूचित जमाती किंवा आदिवासी भटके, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेले, अपंग, स्त्रिया.

* स्वतंत्रपूर्व काळात मुंबई राज्यातील स्टार्ट कमिशनने मागासवर्गीयांना इतरांच्या बरोबरीने शिक्षण दिले जावे यासाठी शिफारशी केल्या.

* मागासवर्गीय समाजातील अधिक मागासलेला व दुर्बल घटक म्हणजे आदिवासी समाज होय. एकाच पुर्वाजापासून उत्पत्ती सांगणारे, रक्तसंबध यांच्यावर आधारित सामाजिक व राजकीय रीतीरिवाज पाळणारे, एकाच विशिष्ट भू प्रदेशात राहणारे लोक म्हणजे आदिवासी होय.

* नागरी वस्तीपासून सूर राहणाऱ्या आदिवासींना अनुसूचित जमाती असे म्हणतात. हे लोक जंगलात राहत असल्याने त्यांना वनवासी असे म्हणतात. तसेच जे डोंगरदऱ्यात राहतात त्यांना गिरीजन असे म्हणतात.

* महाराष्ट्रात कातकरी, डांगी, मावची, तडवी, पाडवी, सावा, परधान, दुबळे, धोडिया, आणि नायक जमाती सह्यांद्रीच्या डोंगर भागात राहतात.

* तर पश्चिम महाराष्ट्रात ठाकूर, महादेव कोळी, विदर्भात कोरकू, तर वारली, कोळी, कोकणी या जमाती ठाणे, रायगड, नाशिक भागात दिसतात. सातपुड्याच्या परिसरात भिल्ल, व हरिजन आहेत.

मागासवर्गीयांच्या शैक्षणिक समस्या

* अंधश्रद्धा - आदिवासी समाजात भूत - भानमातीची विद्या प्रामुख्याने स्त्रिया शिकतात. त्यामुळे त्यांना शिक्षण द्यावे लागते.

* अज्ञान - या समाजात आई व वडील अज्ञान असल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहतात.

* दारिद्र्य, अंतर, शिक्षकाची कमतरता, अभ्यासक्रम व शाळेची वेळ, कुपोषण यामुळे त्यांना शिक्षणात समस्या येतात. 


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.