सोमवार, १६ मे, २०१६

अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद [ AICTE ]

१.६.४ अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद [ AICTE ] 

* एकूण मनुष्यबळ नियोजनात तांत्रिक शिक्षण  महत्वाचे असून त्यावरच रोजगार आणि विकास अवलंबून आहे.

* भारतात तंत्रज्ञान विषयक शिक्षण कौशल्य पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण असे विविध स्तरावर दिले जाते.

* या शिक्षणाची सुरवात १९ व्या शतकात झाली असून १९१३ साली बंगलोरमध्ये भारतीयशास्त्र संस्थेची स्थापना हा एक महत्वाचा टप्पा आहे.

* १९४५ साली अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची स्थापना झाली. राष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च संस्था म्हणून कार्य करणे. आणि तांत्रिक शिक्षणाचा प्रसार करणे हे त्याचे उदिष्ट आहे.

* मानवी संसाधन विकास मंत्रालयाने या परिषदेच्या पुनर्रचनेसाठी राष्ट्रीय कार्यगट स्थापन केला आहे. नव्या कायद्यानुसार १९८८ पासून हि संस्था कार्य करीत आहे.

* नव्या संस्थाना मान्यता देणे, नव्या अभ्यासक्रमांना मान्यता देने, प्रदेश निकष ठरविणे हि कार्ये या संस्थेची कार्ये आहेत.

संघटन

* AICTE च्या पहिल्या ५ वर्षात मानवी संसाधन मंत्रालयाचे अध्यक्ष हेच याचे अध्यक्ष होते.

* १९९३ साली पूर्ण वेळ अध्यक्षांनी नियुक्ती करण्यात आली. त्यांचा कालावधी ३ वर्षाचा असतो.

* कोलकाता, चेन्नई,  कानपूर, आणि मुंबई येथे प्रादेशिक समित्या असून आणखी तीन प्रादेशिक केंद्रे बंगळुरु, भोपाल, व चंदिगढ येथे आहेत.

* या संस्थेचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे असून पूर्ण स्वताचे कार्यालय जे एन यु च्या परिसरात सुरु होत आहे.

संस्थेचे कार्य

* AICTE च्या कामकाजात ९ उपविभागाचे कार्य किंवा ब्युरोचे कार्य महत्वाचे आहे. हे ब्युरो सल्लागार म्हणून कार्य करतात.

* याचे तांत्रिक अधिकारी विद्यापीठे, यु. जी. सी तसेच इतर संस्थामधून अल्पकालावधीसाठी नेमले जातात.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.