बुधवार, १३ एप्रिल, २०१६

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प [२०१६-१७]

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प [२०१६-१७]

* महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री सुधीर मूनगटीवार यांनी २५ हजार कृषी क्षेत्रासाठी जाहीर करून मुख्यत्वे करून कृषीवर  आधारित अर्थसंकल्प मांडला.

* २०१६-१७ हे वर्ष शेतकरी स्वाभिमानी वर्ष म्हणून साजरे करण्यात येईल.

* जलयुक्त शिवार योजनेसाठी १ हजार कोटी रुपये खर्च करणार.

* अकोला व जळगाव जिल्ह्यात दोन पशुवैद्यकीय विद्यालयाचा प्रस्ताव.

* शेतविहिरी, पांदन रस्ते, शेततळी यासाठी २ हजार कोटीची तरतूद.

* जलसिंचनासाठी ७८५० कोटीची तरतूद प्रत्येक जिल्ह्यात हवामान केंद्र उभारणार.

* मुख्यमंत्री सडक योजनेसाठी ५०० कोटीची तरतूद.

* ऊर्जानिर्मिती साठी ५८४ कोटीची तरतूद.

* उद्योगनिर्मितीच्या सवलतीसाठी २६२५ कोटीची तरतूद.

*  कल्याण - भिवंडी - शिळफाटा हा उन्नत मार्ग बांधणार.

* ३ हजार ९२४ किमीचे राष्ट्रीय महामार्ग बांधणार.

* २०२२ पर्यंत सर्वांना घरे त्यासाठी ७०० कोटीची तरतूद.

* अकोला, शिर्डी, चंद्रपूर, कराड यासारख्या विमानतळाचा विकास करणार.

* विजदरासाठी सवलतासाठी १००० कोटीची तरतूद.

* २१ हजार किमीचे रस्ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधनार त्यासाठी ४ हजार ५० कोटीची तरतूद.

* नागपूर शहरात लॉजिस्टिक हबची स्थापना करणार.

* ' माझी कन्या भाग्यश्री ' योजनेसाठी २५ कोटीची तरतूद.

* पोलिसांच्या घरासाठी ३३० कोटीची तरतूद.

* ग्रामीण आरोग्याठी २३० कोटीची तरतूद.

* चंद्रपूर शहराच्या विकासासाठी म्हाडाची स्थापना करणार.

* कृषी क्षेत्रासाठी २५ हजार कोटीची तरतूद.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.