शुक्रवार, १ एप्रिल, २०१६

महाराष्ट्र देशातील निर्यातीत अग्रेसर राज्य

महाराष्ट्र देशातील निर्यातीत अग्रेसर राज्य [२००७-२०१५]

* असोचेम या उद्योग संघटनेच्या अहवालानुसार देशातून होणाऱ्या एकूण निर्यातीत आघाडीच्या पाच राज्यांचा वाटा ६९% असला तरीही महाराष्ट्र व गुजरातचा वाटा ४६% आहे. निर्यातीत महाराष्ट्राने गुजरातला मागे टाकला आहे.

* महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांना भोगोलिक दृष्ट्या विशाल सागरी किनारा असल्याने त्याचा निर्यातीत फायदा झाला.

* निर्यात वाढविण्यात विशेष आर्थिक क्षेत्राची सेझची आवश्यकता असते. त्यानुसार  देशात सध्या सक्रिय असलेल्या सेझपैकी तीन चतुर्थांश सेझ महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाना, तामिळनाडू या राज्यात आहेत.

* निर्यातीच्या बाबतीत महाराष्ट्र व गुजरात हि राज्ये अग्रेसर असली तरीही त्याचा निर्यातविषयक वृद्धीदर उत्तर प्रदेश व हरयाणा यासारख्या राज्यापेक्षा कमी आहे.

* २०१४ व २०१५ या वर्षात उत्तरप्रदेशची निर्यात व हरयाणाची निर्यात १४.४% इतक्या वेगाने वाढली. गुजरातचा निर्यात वाढीचा दर ८% व महाराष्ट्राचा निर्यात दर ७.२% राहिला. असेही या अहवालात म्हटले आहे.

     

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.