शनिवार, १२ मार्च, २०१६

आधार विधेयक कायदा, आधार विधेयकाची ठळक वैशिष्टे

आधार विधेयक कायदा 
आधार विधेयकाला लोकसभेत मंजूर करण्यात आले. अपात्र लोकांकडे पैसा जाऊ न देता पात्र लोकांना त्याचा लाभ मिळून देण्यासाठी राज्यांना अधिकार बहाल करणारे हे विधेयक आहे. आधार [ आर्थिक पोच अन्य सबसिडी, लाभ आणि सेवा ] विधेयक २०१६ मंजूर करण्यात आल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांना कोट्यवधी रुपयांची बचत करण्यात येईल. 

आधार विधेयकाची ठळक वैशिष्टे

* सरकारी सेवा व सबसिडीचा लाभ मिळवण्यासाठी आधार आधारभूत मानले जाईल. 

* पासपोर्ट व रेशनकार्ड अधिकृत दस्तऐवज यासाठी आधार अनिवार्य ठरेल. बँकिंग व्यवहारासाठी त्याची आवश्यकता भासेल. 

* पेन्शनसारख्या सामाजिक हिताच्या योजनाही आधाराशी संलग्न राहतील. 

* भारतीय नागरिक असल्याचा पुरावा नसून भारतात निवास करणाऱ्याचे ते ओळखपत्र आहे. 

* एल.पी. जी. ग्राहकासाठी आधारशी जोडल्याने सरकारचे १५ हजार कोटीची बचत झाली. 

* काही राज्य सरकारांनी पि. डी. एस आधारशी संलग्न केल्यामुळे त्यांची २३०० कोटींची बचत. 

* आधारधारकाचे तपशील त्याच्या संमतीशिवाय कोणालाही देता येणार नाही. हि माहिती कोणी लिक केल्यास शिक्षा. 

* आधार कार्ड दररोज ५ ते ७ लाख लोकांना मिळत नाही. 

* आधार विधेयकाची मूळ संकल्पना युपिएची, मात्र युनिक आयडीचा वापर कशासाठी करणार, याविषयी स्पष्टता नव्या विधेयकात त्याचे सारे तपशील स्पष्ट केले आहेत.     

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.