मंगळवार, १ मार्च, २०१६

अर्थसंकल्प २०१६-१७

अर्थसंकल्प २०१६-१७ 

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत २०१६-१७ चा अर्थसंकल्प सादर केला. आणि त्या अर्थसंकल्पातील काही प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.

* ग्रामीण भागावर विशेष सोयी देण्यावर भर दिला आहे.
* महागाई दर ५.४ वर आणला.
* आता ४६% शेती सिंचनाखाली आहे, तिची टक्केवारी वाढविण्यावर भर देण्यात येईल.
* १७ हजार कोटी रुपये एका वर्षात सिंचनासाठी खर्च करणार
* ६० हजार कोटी भूजल पातळी वाढविण्यावर करणार
* सॉइल हेल्थ कार्ड प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणार
* शेतकऱ्यासाठी ९ लाख रुपये कर्ज उपलब्द करून देणार
* येत्या ५ वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार
* मधाची निर्यात जास्त करण्याचा प्रयत्न
* प्रत्येक ग्रामपंचायतीला ८० लाख पर्यंतचा निधी उपलब्द करून देण्याचा प्रयत्न
* ग्रामपंचायती व पालीकासाठी २.८७ लाख कोटीची तरतूद
* नगरपालिकेला वर्षाला २१ कोटी रुपयाचा निधी उपलब्द करून देणार
* स्वछ भारत अभियानावर ९ हजार कोटी रुपये खर्च करणार
* पंतप्रधान फसल बिमा योजना फायद्याची करणार
* १८ हजार ५४२ गावामध्ये वीज पोहोचविणार
* ३ वर्षात ५ लाख हेक्टर जमीन सेंद्रिय शेतीखाली आणणार
* गरीब महिलांच्या नावाने LPG कनेक्शन देणार त्यासाठी २ हजार कोटीची तरतूद
* मनरेगा साठी ३८ हजार ५०० कोटीची व्यवस्था
* दीड कोटी भारतीयांना LPG कनेक्शन देणार
* डाळ उद्योगासाठी ५०० कोटीची तरतूद
* शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा म्हणून यासाठी ऑनलाईन पद्धतीने माल विकत घेणार
* ६२ नवीन नवोदय महाविद्यालयाची स्थापना करणार
* उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थांना कागदपत्रे ऑनलाईन उपलब्द करून देणार
* नाबार्डच्या माध्यमातून २० हजार कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न
* बी- बियाणे तपासणीसाठी २००० हजार प्रयोगशाळा उभारणार
* पंतप्रधान कौशल्य विकास योजना १५०० केंद्रामधून राबविणार
* स्वस्त दरात औषध पुरवणारी ३००० हजार दुकाने सुरु करणार
* ९७ हजार कोटी रुपये ग्रामसडक योजनेसाठी खर्च करणार
* रस्ते आणि रेल्वे यांच्यासाठी २ लाख १८ हजार कोटी खर्च करणार
* वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी तरुणांना संधी देणार
* सार्वजनिक वाहतुकीत आता जुनी परमिट योजना मोडीत काढणार
* खासगी बसेस वेगवेगळ्या मार्गावर चालवण्यासाठी मुभा असणार
* वापरात नसलेली देशातील १६० विमानतळ पुन्हा सुरु करणार
* अणुवीजनिर्मितीला वर्षाला ३ हजार कोटीची तरतूद
* धोकादायक स्थितीत काम करणाऱ्या ऑइल कंपन्यांना नफा वाढवून देण्याचा प्रयत्न करणार
* अन्नप्रक्रिया उद्योगासाठी १०० टक्के परकीय गुंतवणुकीला हिरवा कंदील
* २०१८ पर्यंत देशातील प्रत्येक गावात वीज
* प्रत्येक कुटुंबाला १ लाखाचे विमा कवच मिळणार
* चिटफंड घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी नवा कायदा आणणार
* वर्षभरात १० हजार किमीचे रस्ते निर्मितीसाठी सरकारने पुढाकार घेतला
* येत्या तीन वर्षात देशातील सर्व पोस्ट ऑफिस कार्यालयात ATM मशीन लावणार
* दुग्ध विकासासाठी चार नवीन योजना
* प्रत्येक जिल्ह्यात डायलिसीस केंद्र उघडणार
* सरकारी विमा कंपन्या शेअर बाजारात नोंदणी करणार
* खतांची सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा विचार
* स्टार्ट अप साठी लागणारा परवाना एकाच दिवशी मिळणार
* बुडीत बँकांना जिवंत करण्यासाठी २५ हजार कोटी रुपये
* कमीत कमी ३०० दिवस काम करण्याचा नियम २४० दिवसावर आणला
* घरभाड्यावरील कर सवलत मर्यादा २४ हजारावून ६० हजारावर
* पाच लाख कमाई असणारया नोकरदारांना करात ३००० हजाराचा फायदा
* पाहिलं घर विकत घेणारयाना ५० हजाराची सवलत
* १० लाखापेक्षा अधिक महाग गाड्या महागणार
* १ कोटी कमाई असणाऱ्यांना अधिभार वाढला १२ टक्यावरून थेट १५ टक्क्यावर केला
* कररचनेत कोणताही बदल नाही
* कर थकबाकी दंड व्याज माफीसाठी वन टाईम तंटा निवारण योजना
* देशाच्या सकाळ राष्ट्रीय उत्पनानात २०१७-१८ पर्यंत वित्तीय तुट ३% पर्यंत आणण्याचा प्रयत्न


यंदाचा अर्थसंकल्प ९ मुद्याना आधारून 
* २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि विविध सुधारणांचा यात समावेश होतो.
* डायलिसिस काही उपकरणांना सीमाशुल्कात सुट
* १ मे २०१८ पर्यंत देशातील प्रत्येक गावात वीज
* कर्मचारी भविष्य निधी खाली नव्याने येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पहिली तीन वर्षे सरकारचे योगदान ८.३३% राहील.
* स्टार्ट अप उद्योगासाठी तीन वर्षासाठी कर सवलत
* Stand up उद्योगासाठी ५०० कोटीची तरतूद
* रस्ते आणि महामार्गासाठी ५५ हजार कोटी रुपये.

   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.