मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०१६

राष्ट्रसभेचे ध्येयधोरण, व राष्ट्रसभेच्या मागण्या

राष्ट्रसभेचे ध्येयधोरण 
* राष्ट्र सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्य्योमेश्चंद्र बनर्जी होते.
* देशाच्या भिन्न भिन्न भागात प्रदेशात राहणाऱ्या व देशसेवा करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यामध्ये वैयक्तिक जवळीक व मैत्री निर्माण करणे.
* सर्व देशप्रेमी लोकामधील वंशभेद, पंथभेद, व प्रांतीय संकुचित भावना नाहीशी करण्याचा प्रयत्न करणे.
* लॉर्ड रिपनच्या कारकिर्दीत उदयास आलेल्या राष्ट्रऐक्याच्या भावनेची वाढ व संघटन करणे.
* सध्याच्या काळातील अत्यंत महत्वाच्या सामाजिक प्रश्नावरील देशातील सुशिक्षित वर्गाच्या मतांच्या मागोवा घेणे.
* पुढच्या वर्षीच्या काळात हिंदी नेत्यांनी हाती घ्यावयाच्या कार्यक्रमाचा विचार करणे.

राष्ट्रसभेच्या मागण्या 
* व्हाईसराय व गवर्नर यांच्या कार्यकारी मंडळाची वाढ करावी व त्यामधील हिंदी सभासदांची निवडनुक तत्वानुसार व्हावी.
* भारतमंत्री व त्याचे मंडळ बरखास्त करण्यात यावे.
* स्थानिक स्वराज्य संस्थाना अधिक अधिभार व स्वायत्तता मिळावी.
* लष्करी खर्च कमी करावा व लष्करात इंग्रज अधिकाऱ्याच्या जागी हिंदी अधिकाऱ्यांच्या नेमणुका कराव्यात
* हिंदी कापड उद्योगाचे पुनर्जीवन नवीन उद्योग काढून बेकारीचे निवारण करावे.
* न्यायसंस्था सरकारी दबावाखालून दूर व्हावी.
* हिंदुस्तानाबाहेर स्थाईक झालेल्या हिंदी लोकांच्या हितसंबधाचे रक्षण व्हावे.
* ICS परीक्षा हिंदुस्तानात घ्याव्यात.
* जमीनदारांच्या जुलुमापासून रयतांचे संरक्षण व्हावे.
* जमीन महसूल कमी करावा.
* वृत्तपत्रांना अधिक स्वतंत्र मिळावे.
* कमी दरांमध्ये शेतकऱ्यांचा कर्ज देणाऱ्या ग्रामीण बँका स्थापन कराव्या.
* कारभारातील वरच्या जगावर हिंदी लोकांना घेतले जाते.
* हिंदी लोकांच्या तांत्रिक व ओद्योगिक शिक्षणाची सोय करावी.
* लष्करी प्रशिक्षन देणारी आणखी काही महाविद्यालयाची स्थापना करण्यात यावी.
 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.