शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०१६

हैद्राबाद संस्थानाचे विलीनीकरण

हैद्राबाद संस्थानाचे विलीनीकरण 

* मोगल सत्तेचा उतरत्या काळात देशातील बाजूनी मोगल सत्तेचा पराभव झाला होता अशा परिस्थितीत मात्र भारताच्या मध्यभागी असलेल्या आंध्र प्रदेश राज्यात हैद्राबाद संस्थामध्ये मोघलांची शेवटची सत्ता टिकवून होती. 

* भारताला स्वतंत्र मिळाले तेव्हा हैद्राबादच्या निजामाने भारत पाकिस्तान राज्यात विलीन न होता अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला परंतु या राज्यातील जवळपास ८५% जनता हिंदू असल्यामुळे त्यांनी आपले संस्थान भारतात सामील व्हावे यासाठी प्रयत्न केला. 

* परंतु सत्ता लालुसेने निजामाने संस्थानिकांच्या विरोधात बंड करून करणाऱ्या लोकावरती  अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. 

* हैद्राबाद संस्थान भारतात सामील व्हावे यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात चळवळी सुरु केल्या. लोकांच्या या चळवळीला उग्र स्वरूप प्राप्त झाले. त्या परिस्थितीत निजाम, रझाकार, इत्याहादुल या मुस्लिम राज्यकर्त्यांना हैद्राबाद संस्थान भारतात विलीन व्हावे हा निर्णय योग्य वाटत नव्हता या परिस्थितीमध्ये कासीम रिझवी आणि रझाकार संघटना या धार्मिक संघटना म्हणून ओळखल्या जात होत्या. 

* हैद्राबाद संस्थानातील लोकांचे आंदोलन मोडून काढण्याची जबाबदारी निजामाने या संघटनेकडे दिली, आणि संघटनेकडे लवकरच या संस्थानाकडे धुमाकूळ घातला उठाव कर्त्यावर रझाकार संघटनेने जाहीर केले. 

* सरदार वल्लभभाई १३ सप्टेंबर १९४८ रोजी हैद्राबाद संस्थानात संपूर्ण भारतीय लष्कर घुसवून रझाकारी सैन्याचा बंदोबस्त केला. 

* जवळपास १३ महिने हा संघर्ष सुरु राहिला या लष्करी कारवाईला ऑपरेशन पोलो या नावाने ओळखले जाते. आणि शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैद्राबादच्या निजामाने शरणागती पत्करली व हैद्राबाद संस्थान भारतात विलीनीकरण करण्यात आले. 


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.