शनिवार, ६ फेब्रुवारी, २०१६

लॉर्ड डलहौसीची कारकीर्द [ १८४८ - १८५६ ]

लॉर्ड डलहौसीची कारकीर्द [ १८४८ - १८५६ ] 
* वेलस्लीनंतर इंग्रज सत्तेची मोठी वाढ लॉर्ड डलहौसी केली. डलहौसी कारकिर्दीत दुसरे इंग्रज - शीख युद्ध घडून आले. दोन मोठ्या लढाया होऊन शिखांचा पूर्ण पराभव झाला. या विजयानंतर डलहौसीने पंजाबमधील शिखांचे राज्य खालसा करून इंग्रजी राज्यात विलीन करून टाकले.

* तसेच दत्तक वारस नामंजूर या तत्वानुसार त्याने सातारा, नागपूर, झाशी, संबलपुर, जैतपूर, उदयपुर, इत्यादी राज्ये खालसा केली आणि इंग्रजी राज्यात विलीन केली. याशिवाय तैनाती फौजेची खर्चाची येणे बाकी वसूल करण्यासाठी निजामाकडून त्याने वऱ्हाड प्रांत घेतला. बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्याच्या दत्तक पुत्राची नानासाहेबाची पेन्शन जप्त करण्यात आली. कर्नाटकच्या नवाबाच्या मृत्यू त्याचे राज्य खालसा करण्यात आले.[ १८५३ ]. तंजावरच्या राज्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाची जहागीरीरही जप्त करण्यात आली. गैरकारभाराच्या नावाखाली अयोध्येच्या  नावाबाचे उरले सुरले राज्य खालसा केले.

* डलहौसीच्या धोरणाने हिंदुस्तानातील जास्तीत जास्त प्रदेश एकसंध अशा इंग्रजी आला. डलहौसी धोरणाने हिंदुस्तानातील धोरणाने अराजक कमी झाले. लोकांना स्वस्थ व शांतता हे इंग्रज राजवटीचे फायदे मिळाले, हे कबूल करावयास हवे. प्रदेश खालसा केल्याबरोबर तो आपली कार्यक्षम राज्ययंत्रणा त्या ठिकाणी उभा करी. त्याच्याच कारकिर्दीत रेल्वे, पोस्ट, तारायंत्रे, हि आधुनिक दळणवळणची साधने हिंदुस्तानात सुरु करण्यात आली.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.