मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१६

असहकार चळवळीचा शेवट व अपयशाची कारणे

असहकार चळवळीचा शेवट व अपयशाची कारणे 

असहकारचा शेवट - असहकार चळवळीने पूर्ण हिंदुस्तानात इंग्रजांच्या मनात धास्ती भरली होती. चळवळीचा कार्यक्रम सर्वत्र जोमाने सुरु असताना उत्तर प्रदेशातील चौरीचोरा या ठिकाणी ५ फेब्रुवारी १९२२ रोजी एक मिरवणुकीवर गोळीबार केला. संतप्त झालेल्या लोकांनी मात्र पोलिस कचेरीवर हल्ला करून कचेरीस आग लावली. यावेळी जवळपास २१ पोलिस मारले गेले.

अपयशाची कारणे

* संपूर्ण देशात जुलुमी इंग्रजांच्या विरोधात चालू असलेल्या या चळवळीमध्ये थोडीफार हिंसात्मक घटना घडणारच होती. त्याकडे गांधीजीनी दुर्लक्ष केले. व संपूर्ण अहिंसात्मक चळवळीची अपेक्षा केली.

* हिंदू - मुस्लिम एकतेसाठी गांधीजी भूमिका योग्य असली तरीही खिलाफत चळवळ हि धार्मिक तर असहकार चळवळ हि स्वराज्यासाठी होती.

* असहकार ठरावामध्ये मांडण्यात आलेल्या अटी व नियमांची सर्व नागरिकांनी अंमलबजावणी केली नाही.

* परदेशी माल विकत घेवून जाळून टाकणे किंवा त्या मालाची होळी करणे, यातून स्वराज्याचा उद्देश फारशा साध्य होऊ शकत नाही

* चळवळ सुरु असताना राष्ट्रसभेतून प्रागतिक पक्ष नावाचा पक्ष बाहेर पडला होता.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.