सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१६

इतर ठिकाणचे उठाव

इतर ठिकाणचे उठाव 
* उत्तर प्रदेशातील बनारसच्या प्रदेशात ४ जूनला बंड पुकारले गेले. कर्नल नील या लष्करी अधिकाऱ्याने आपल्या गोऱ्या व शीख लोकांच्या फौजेच्या सहाय्याने हे बंड मोडून काढले.
* बंडाच्या कालात पंजाब शांत राहिला. पण तेथेही लाहोरच्या हिंदी शिपायांनी बंड पुकारले.
* नागपुरची राणी बाकाबाई हि इंग्रजांशी एकनिष्ठ राहिली. नागपुरात बंड यशस्वी न झाल्याने ते दक्षिणेकडे पसरू शकले नाही.
* मध्य प्रदेशातील सागर प्रदेशात बाणपूर व शहागड येथील राजांनी व रामगढच्या राणीने बंडाचा झेंडा उभारला.  याशिवाय होळकरांच्या राज्यात इंदूर व महू येथे, राजपुतान्यात अजमेर, नासिराबाद व रोहीलखंडात काही ठिकाणी शिपायांची बंडे झाली.
* ग्वाल्हेरच्या लढाईनेच बंडाचा खरा शेवट झाला. झाशीची राणी रणांगणावर ठार झाली. नानासाहेब पेशवा, बेगम हजरत महाल इत्यादी बंडवाल्यांच्या नेत्यांनी देशत्याग केला. अशा प्रकारे इंग्रजी साम्राज्याविरुद्ध हिंदी लोकांनी घडवून आणलेला हा शेवट सशस्त्र उठाव अयशस्वी झाला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.