मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१६

नेहरू रिपोर्ट

नेहरू रिपोर्ट 
* राष्ट्र्सभा, मुस्लिम लीग, इतर राजकीय संघटनांनी सर्वपक्षीय बैठक १९ मे १९२८ रोजी मुंबईत डॉ अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आली. या बैठकीमध्ये मोतीलाल नेहरू यांच्या समितीने देशातील सर्व राजकीय घटनांचा सविस्तर अभ्यास करून आपला अहवाल तयार केला. या अहवालाला नेहरू अहवाल असे म्हणतात.

नेहरू रिपोर्ट च्या शिफारशी 
* हिंदुस्तानला साम्राज्याअंतर्गत स्वराज्य ताबडतोब मिळावे.
* हिंदुस्तानात संघराज्यात्मक शासन तयार करून घटक राज्यांना स्वायत्ता प्राप्त करून देणे.
* हिंदुस्तान हे निःधर्मीय राष्ट्र बनेल त्यासाठी जातीय मतदार संघाची आवश्यकता नाही.
* सिंध हा स्वतंत्र प्रदेश करून वायव्य सरहद्द प्रांताला इतर प्रदेशासारखा स्वतंत्र दर्जा द्यावा.
* संविधानामध्ये नागरिकांना मुलभूत अधिकार देवून त्याची स्वतंत्र यादी तयार करण्यात यावी.
* केंद्रीय कायदे मंडळाची दोन सभागृह असावी.
* गवर्नर जनरलने प्रधान मंत्र्याची नेमणूक करून त्याच्या सल्यानुसार इतर मंत्र्याची नेमणूक करावी.
* घटक राज्यांच्या गवर्नरची नेमणूक इंग्लंडच्या राजाकडून व्हावी व या गवर्नर मुख्य मंत्र्याची नेमणूक करून त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्याची नेमणूक करावी.
* कायदे मंडळाची मुदत पाच वर्षाची असावी.
* गवर्नर जनरलने न्यायमंडळातील न्यायाधीशांच्या नेमणुका कराव्या व त्या न्यायाधीशाला दूर करण्याचा अधिकार केंद्रीय कायदे मंडळाला द्यावा.


  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.