मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०१६

राष्ट्रसभेची [ काँग्रेसची ] स्थापना : सन १८८५

राष्ट्रसभेची [ काँग्रेसची ] स्थापना : सन १८८५ 
* डिसेंबर १८८५ मध्ये पुण्यास कॉलरयाची साथ सुरु झाली. म्हणून पुण्याऐवजी मुंबईत अधिवेशन घेण्याचे ठरविले. त्यानुसार सर्व हिंदुस्तानातील प्रमुख नेते मुंबईस आले. २८ डिसेंबर १८८५ रोजी राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन भरले. अध्यक्षस्थानी कलकत्त्याचे थोर कायदेपंडित व विचारवंत उमेशचंद्र बनर्जी हे होते. याच अधिवेशनात ' हिंदी राष्ट्रसभेची ' Indian National Congress स्थापना करण्यात आली.

* सर्व हिंदुस्तानातून एकूण ७२ प्रतिनिधी राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनात हजर होते. त्यामध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशा मेहता, न्या तेलंग, दिनशा वॉच्छा,  नरेंद्र सेन, गीरीजाभूषण मुखर्जी, न्या रानडे, डॉ भांडारकर, आगरकर, टिळक, रंगया नायडू, जी सुब्रम्ह्ण्याम, अय्यर, वीर राघवाचार्य, आनंद चार्लू, गंगाप्रसाद मुखर्जी, इत्यादी हिंदी नेत्यांचा समावेश होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.