सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१६

१८५७ च्या उठावाची ठिकाणे

१८५७ च्या उठावाची ठिकाणे 
* दिल्ली - मीरत पासून दिल्ली ३० मैल अंतरावर आहे. ते अंतर काटून बंडवाले शिपाई दुसऱ्या दिवशी दिल्लीस आले. बहादुरशहा यास सिंहासनावर बसवून त्याची राजवट सुरु झाल्याची घोषणा त्यांना करावयाची होती. बादशहा हा नावाचाच बादशहा बनला होता. २४ तासात दिल्ली बंडवाल्यांच्या हाती आली. कालपर्यंत गुलाम असलेला बहादुरशहा त्यांनी हिंदूस्थानचा सम्राट बनवला. वास्तविक उत्तर हिंदुस्तानातील वेळची इंग्रजांची अवस्था मोठी नाजूक होती. परंतु इंग्रजांनी पंजाब वगैरे प्रदेशातून दिल्ली कडे फौजा गोळा केल्या. दिल्ली म्हणजे हिंदुस्तानची पूर्वापारची राजधानी आणि ती आपण काबीज केली. असा इंग्रजांचा अंदाज होता.

* प्रसिद्ध इतिहासकार थॉमसन व गरेट म्हणतात ' बंडाचा प्रारंभ तर यशस्वी झाला, पण उत्तर हिंदुस्तानातील इंग्रजांच्या नाजूक अवस्थेचा फायदा उठवणारा एकही कार्यक्षम नेता बंडवाल्याजवळ नव्हता हे लवकरच स्पष्ट झाले. १५ सप्टेंबर १८५७ रोजी इंग्रज व बंडवाले यांच्यातील लढाईस तोंड फुटले. बंडवाल्यांनी इंग्रजी फौजांशी १० दिवस घेतले.

* कानपूर - कानपूर शहराचा विकास कंपनीच्या कारकिर्दीत झाला होता. कानपूर येथे इंग्रजी कंपनीच्या छावण्या असत. जवळच ब्राम्हवर्त येथे मराठ्यांचा पदच्युत पेशवा दुसरा बाजीराव याचे निवासस्थान होते. मृत्यूपूर्वी त्याने धोंडोपंत उर्फ नानासाहेब याला दत्तक घेतले. पण बाजीरावानंतर त्यास मिळणारा आठ लाखाचा तनखा, छोटी जहागीर, व पदव्या नानासाहेबास बहाल करण्यास इंग्रजी राज्यकर्त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे नानासाहेबाच्या हृदयात सुडाच्या अग्नी धुमसत होत्या पण इंग्रजांच्या सामर्थ्यापुढे तूर्त त्याने नमते घेतले होते. आता सूड उगवण्याची आयती संधी चालून आली होती.

* १ जुलै रोजी नानासाहेब पेशवा बनल्याचा व कंपनी राज्य नष्ट झाल्याचा जाहीरनामा काढण्यात आला. परंतु कानपूर हातातून गेल्याचे कळताच इंग्रजांनी तिकडे फौजा पाठविल्या होत्या. आणि या फौजांचा पराभव केल्याशिवाय नानासाहेबाची कानपूरमधील नवी राजवट सुरक्षित राहणार नव्हती. इंग्रज फौजा कानपुरावर नवी राजवट सुरक्षित राहणार नव्हती. इंग्रज फौजा कानपूरावर येण्यापुर्वीच नानासाहेबाने फौजेनिशी कूच करून त्याच्याशी लढाई दिली. पण नानासाहेब यांचा पराभव झाला.

* पुढे सैन्याची जमवाजमव करून नानासाहेब व त्याचा सेनापती तात्या टोपे यांनी कानपुरवर चाल केली व पुन्हा ताब्यात घेतले. त्यानंतर ६ डिसेंबर १८५७ ला पळ काढावा लागला.


   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.