सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१६

१८५७ च्या उठावाचे परिणाम

१८५७ च्या उठावाचे परिणाम 
* कंपनीची राजवट बरखास्त झाली : स १८५७ चा कायदा - रेग्युलेटिंग अक्ट हा कायदा इंग्लिश पार्लमेंटने पास केल्यापासून सरकारचे कंपनीच्या कारभारावरील कंपनीच्या कारभारावरील नियंत्रण वाढतच गेले होते.सरकारने १८५७ साली खास कायदा मंजूर करून कंपनीची राजवट बरखास्त केली व तेथून पुढे हिंदुस्तानात इंग्लंडच्या राणीची राजवट सुरु झाल्याचे घोषित करण्यात आला. कंपनीचे सर्व भूदल व आरमार राणी सरकारकडे घेण्यात आले. राणीच्या वतीने हिंदुस्तानचा व्हाईसराय हा हिंदुस्तान सरकारचा कारभार पाहणार होता. पूर्वीची बोर्ड ऑफ कंट्रोल व बोर्ड ऑफ डायरेक्टर हि मंडळे बरखास्त करून त्यांच्या जागी भारत मंत्री आणि त्यांचे मंडळ [ The secretary of state in council ] हा भारतमंत्री पार्लमेंटचा व ब्रिटीश मंत्रिमंडळाचा सभासद असे.

* राणीचा जाहीरनामा : राज्यकर्त्यांचे उदार धोरण - १८५७ च्या उठवातून इंग्रज राज्यकर्त्यांनी अनेक धडे घेतले. हिंदुस्तानातील असंतोषाची तीव्र जाणीव त्यांना उठावाने झाली. त्यामुळे त्यांनी हिंदुस्तान विषयक आपले धोरण बदलले. हे  धोरण १ नोव्हेंबर १८५८ रोजी अलाहाबाद येथे दरबार भरवून व तेथे दरबार भरवून व तेथे राणीचा जाहीरनामा घोषित करून स्पस्ष्ट केले. राणीचा जाहीरनामा असा - [ आम्ही आता राज्यवृद्धीच्या उद्योगाला हात घालणार नाही, देशी संस्थानिकांचे हक्क, मानमरातब आणि प्रतिष्ठा यांचा आमच्याप्रमाणे मान राखू, त्यांनी व आमच्या प्रजेने समृद्धीत राहावे अशीच आमची इच्छा आहे. अंतर्गत शांतता व चांगले सरकार यामुळेच हिंदुस्तानात सामाजिक प्रगती घडून येईल. तसेच आम्ही जाहीर करतो की, देशी संस्थानिकांचे कंपनीशी जे करारदार झाले असतील ते येथून आम्ही पाळू. संस्थानिकांना आपल्या इच्छेनुसार दत्तक घेता येईल. त्यांची राज्ये विलीन केली जाणार नाहीत. धर्मासाठी कोणावर कृपा व अन्याय केला जाणार नाही. सरकार धर्माच्या बाबतीत ढवळाढवळ करणार नाही. सरकारी नोकऱ्या लायकी पाहून दिल्या जातील. धर्म, वर्ग, किंवा जात त्यांच्या मार्गात येणार नाहीत.

* हिंदी लष्कराची पुनरचना करण्यात आली - १८५७ चा उठाव प्रथम हिंदी लष्करात झाला, त्यामुळे इंग्रजांनी या लष्कराची पुनरचना करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले.
* संस्थानांसंबंधीच्या आक्रमक धोरणाचा त्याग 
* इंग्रजांचे सामाजिक सुधारनासंबंधीचे धोरण बदलले 
* इंग्रजी राजवटीबद्दल दहशत व तिरस्कार 
* उठवपासून हिंदी लोकांनी घेतलेला धडा 
* हिंदू मुसलमानमधील दरी वाढत गेली 
* हिंदूस्थानचे परराष्ट्रीय धोरण इंग्लंडशी बद्ध झाले 
* इंग्रजांची हिंदुस्तानवरील पकड घट्ट झाली   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.