गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६

बंगालची फाळणी

बंगालची फाळणी 
* बंगाल प्रांत मोठा असल्या कारणाने त्याचा राज्यकारभार पाहणे शक्य नव्हते. 
* लॉर्ड कर्झन हा मोठ्या तडफेचा गवर्नर होता. 
* इंग्रजी राज्याशी दिवसेदिवस शत्रुत्व करणाऱ्या सुबुद्ध बंगाली लोकांचे ऐक्य भंग पावणार होते. हा एक राज्यकर्त्यांचा कुटील डाव होता. खेळण्याचे लॉर्ड कर्झनने ठरविले. 
* सन १९०३ च्या प्रारंभास बंगालचा गवर्नर सर आंड्र्यू फ्रेझर याने कर्झनच्या आदेशाने फाळणीची योजना तयार केली. कर्झनने सर्वसाधारण अनुमती देवून योजना तयार केली. 
* मे १९०५ मध्ये लंडनच्या standard या वर्तमानकाळात फाळणीस विलायत सरकारने मान्यता दिली हे प्रथम छापले. 
* हिंदुस्तान सरकारने हि योजना ७ जुलै १९०५ मध्ये सिमल्याहून प्रसिद्ध केली. 
* बंगाल प्रांतापासून चितगाव, डाक्का, व राजेशाही विभाग व माल्डा जिल्हा प्रदेश तोडून ते आसाम प्रांतास जोडले जातील. दार्जीलिंग बंगालमध्येच राहील. 
* या नव्या प्रांताचे नाव पूर्व बंगाल व आसाम असे राहील. डाक्का हि त्याची राजधानी राहील. त्याचा कारभार ले गवर्नर पाहिलं. 
* बंगाल प्रांताच्या पश्चिमेकडील काही प्रदेश व छोटा नागपूर भागातील पाच हिंदू संस्थाने बंगालपासून अलग केली जातील. 
* बंगाल प्रांतापासून  झालेल्या नव्या पूर्व बंगाल प्रांतास मुसलमान बहुसंख्य होते. खुद्द बंगाल प्रांतात हिंदूची संख्या ४ कोटी व बंगाली हिंदूची संख्या १ कोटी ८० लाख होती. 
* सुरेंद्रनाथ बनर्जी यांनी आपल्या ' The Bengalee ' या पत्रातून त्याच दिवशी बंगालमध्ये अभूतपूर्व लढा सुरु झाला. व ५० हजाराच्या सभा घेतल्या. 
* जो पर्यंत बंगालची फाळणी रद्द होत नाही, तो पर्यंत बहिष्कार चळवळीस सरकारविरुद्ध पाठींबा व्यक्त करण्यात आले. 
* बकिमचंद्र यांच्या आनंदमठ या कादंबरीतील वन्दे मातरम हे गीत सगळ्यांच्या ओठावर होते. 
* दोन बंगालमधील बंगाली लोकांच्या ऐक्याचे प्रतिक म्हणून ' फेडरेशन हॉल ' या भव्य इमारतीची पायाभरणी झाली. 
* शेवटी हि फाळणी रद्द करण्याचा त्यांना निर्णय घ्यावा लागला. १२ डिसेंबर १९११ रोजी दिल्ली भव्य दरबार भरून ब्रिटीश सम्राट पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा केली. आणि हिंदी राष्ट्रवादी चळवळीचा हा पहिला विजय होता.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.