सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१६

महाराष्ट्रातील वृत्तपत्र

महाराष्ट्रातील वृत्तपत्र 

* दर्पण - महाराष्ट्रातील थोर विचारवंत व समाजसुधारक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण हे मराठीतले पहिले वर्तमानपत्र सुरु केले. लवकरच हे वृत्तपत्र साप्ताहिक केले. दिग्दर्शक नावाचे मासिक १८४० मध्ये जांभेकरांनी सुरु केले. मराठीतले हे पहिले मासिक म्हणून ओळखले जाते.
* सूर्याजी कृष्णाजी यांनी संपूर्ण मराठीत मजकूर असलेले मुंबई अखबार हे वर्तमानपत्र सुरु केले.

* प्रभाकर - बाळशास्त्री जांभेकर यांचे सहकारी गोविंद विठ्ठल उर्फ भाऊ महाजन यांनी २४ ओक्टोंबर १८४१ रोजी प्रभाकर नावाचे वृत्तपत्र सुरु केले.

* केसरी व मराठा - १८८१ साली मध्ये आपल्या विचारांच्या प्रचारार्थ हे टिळकांनी वृत्तपत्रे सुरु केले.
* सुधारक - आगरकरांनी टिळक यांच्या पासून फारकत घेवून १८८८ मध्ये सुधारक नावाचे स्वतंत्र वृत्तपत्र सुरु केले.
*  विरेश्वर छत्रे यांनी १८४२ मध्ये ज्ञानसिंधू नावाचे वर्तमानपत्र सुरु केले.
* कृष्णाजी रानडे १८४९ मध्ये ज्ञानप्रकाश तर विष्णुशास्त्री पंडितांनी १८६२ साली इंदूप्रकाश सुरु केले.
* प्रार्थना समाजाचे सुबोधपत्रिका, चिपळूणकरांचे निबंधमाला, कृष्णराव भालेराव १८७७ मध्ये दीनबंधू हे वृत्तपत्र सुरु केले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.