सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१६

उठावाची ठिकाणे - लखनौ, झाशी

उठावाची ठिकाणे - लखनौ, झाशी 
* लखनौ - लखनौ हि औंधची अयोधा राजधानी होती. लखनौ मधील इंग्रज लोक व गोरे सैन्य यांनी प्रसंगावधान राखून इंग्रज रेसिडेन्सित आश्रय घेतला. औंधच्या नवाबाच्या हजरत महाल या बेगमेने बंड वाल्यांचे नेतृत्व स्वीकारले. बहादूरशहा बादशहाचा अंकित म्हणून औंधचा नवा नवाब राज्य करणार होता. पण हि राजवट फार काल तगली नाही. सप्टेंबर १८५७ मध्ये सेनापती औट्रम व हवलॉक हे आपल्या फौजा घेवून लखनौवर चाल करून आले.

* बिहार - बिहारमधील जगदीशपूरचा वृद्ध जमीनदार कुवरसिंह यावर इंग्रजानी बरीच जुलुमी जबरदस्ती केली. त्याने बंड वाल्या शिपायांचे नेतृत्व केले. त्याने अनेक लढाया केल्या. पण इंग्रजी फौजेपुढे त्याचा निभाव लागला नाही. १८५७ साली मरण पावला. त्याच्या नंतर त्याच्या अमरसिंह नावाच्या बंधूने इंग्रजांशी संघर्ष चालू ठेवला. पण यश मिळाले नाही.

* झाशी - दत्तक वारस नामंजूर या तत्वानुसार झाशीच्या राणीच्या लक्ष्मीबाईच्या दत्तक पुत्रास डलहौसीने राज्याधिकार नाकारला होता. व  झाशीचे राज्य खालसा केले होते. झाशी लढवण्याची राणीने पूर्ण लष्करी तयारी केली. सर ह्यु रोज या सेनानीच्या अधिपत्याखाली इंग्रज फौजा झाशीवर चाल करून आल्या आणि त्यांना झाशीच्या किल्य्यास वेढा दिला. एवढ्यात नानासाहेबाचा सेनापती तात्या टोपे झाशीच्या बचावास धावला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.