गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६

शतकातील महत्वाचा शोध

शतकातील महत्वाचा शोध 

* द्वैती कृष्णविवराचे अस्तित्व सिद्ध गेले शतकभर विज्ञानाला हुलकावणी देणाऱ्या आणि विश्वाच्या जडणघडण संबंधी मानवी आकलनात महत्वाची भर घालू शकणाऱ्या [गुरुत्व तरंगाच्या] अस्तित्वाचा पुरावा गुरवारी सापडला.

* अल्बर्ट आईनस्टाईण १९१६ साली मांडलेल्या व्यापक सापेक्षवादाच्या सिद्धांतामध्ये गुरुत्व तरंगाच्या अस्तित्वाचा दावा केला होता. मात्र आजपर्यंत याबाबत ठोस पुरावा लागला नाही. हि कोंडी सुटून विश्वाच्या निर्मिती साठी योगदान मिळेल.

* १.३ अब्जवर्षापूर्वी दोन कृष्णविवरे एकमेकावर आदळून विलीन झाली होती. त्यातून निर्माण झालेल्या गुरुत्व लहरी निर्माण झाल्या.

* लिगो प्रकल्पा अंतर्गत अमेरिकेतील लिविंगस्टन व हनफर्ड या प्रयोगशाळेत या प्रयोगाची रचना करण्यात आली होती.
जमिनीखालील काही किलोमीटर लांबीच्या विवरामध्ये दोन्ही बाजूला आरसे लावून त्यावरून लेझर किरणाचे झोत प्रवर्तित केले गेले. हि विवरे बाह्य गोंगाटापासून मुक्त ठेवली गेली. त्यामुळे परावर्तीत होणाऱ्या प्रकाश झोतामध्ये गुरुत्व रंगामुळे होणाऱ्या सूक्ष्म बदलांचीही नोंद घेता आली. यावरून गुरुत्व तरंगाचे अस्तित्व सिद्ध करण्यात आले.

* आपल्या देशातील संशोधनाचे नेतृत्व आयुका चे सुशांत बोस यांनी केले.

* गुरुत्वीय लहरी - कुठलाही पदार्थ विश्वातून पुढे जातो. तेव्हा गुरुत्वीय लहरी तयार होत असतात. जेव्हा एखादा पदार्थ पाण्यातून पुढे जातो तेव्हा लहरी निर्माण होतात तशाच प्रकारे येथे गुरुत्व लहरी निर्माण होतात. गुरुत्वीय लहरी ह्या कमी शक्तिशाली असतात व त्याचे अस्तित्व ओळखणे किंवा मापन करणे शक्य झाले नव्हते ते आता शक्य झाले आहे.

* शोधाचे महत्व - आईनस्टाईनच्या सापेक्षवादाच्या सिद्धांताला पुष्टी.  कृष्णविवरे व न्युट्रोन तारांच्या टकरीमुळे गुरुत्व तरंगाची निर्मिती होते असे मानले जात होते,त्यामुळे कृष्णविवरे व न्युट्रोन ताऱ्यांच्या अस्तित्वाला पुष्टी. आपल्या विश्वासंबंधी जी काही माहिती मिळाली होती ती रेडीओ लहरी, गामा किरण, क्ष- किरण अशा प्रकारच्या विद्युत चुंबकीय लहरीच्या माध्यमातून मिळाली आहे. विद्युत चुंबकीय लहरी विश्वात विखरत जातात. त्यामुळे त्यांच्या आधारे होणाऱ्या संशोधनावर मर्यादा आहेत. मात्र त्याच्या पलीकडे विश्वाच्या पसाऱ्यात अनेक रहस्ये लपलेली आहेत, ती शोधण्यासाठी गुरुत्वतरंग मदत मिळणार आहे. व तसेच विश्वाच्या उत्पत्तीनंतरच्या स्थितीचाही शोध घेता येईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.