शनिवार, १३ फेब्रुवारी, २०१६

राष्ट्रसभेचे विविध अधिवेशन

राष्ट्रसभेचे विविध अधिवेशन 

सन १९०५ चे राष्ट्रसभेचे बनारस अधिवेशन 
* सन १९०५ सालचे राष्ट्रीय अधिवेशन बनारस येथे २७ डिसेंबर ते ३० डिसेंबर या दरम्यान भरले. 
* सर्व देशातून या अधिवेशनासाठी साडेसातशेहून अधिक प्रतिनिधी होते. 
* ना. गोपाळ कृष्ण गोखले हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 
* गोखल्यांनी भारतमंत्री मोर्ले व यांना प्रिन्स आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स यांच्या हिंदुस्तान भेटीचे राष्ट्र सभा एकमताने स्वागत करेल. व मवाळ व जहाल गटाच्या बहिष्काराच्या ठरावास पाठींबा देण्याचे ठरविले.

सन १९०६ चे राष्ट्रसभेचे कलकत्ता अधिवेशन 
* राष्ट्रसभेचे सन १९०६ चे अधिवेशन कलकत्त्यास भरवण्यात आले.
* देशाच्या सर्व भागातून १६५० प्रतिनिधी उपस्थित होते.
* या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी आहेत.
* या  अधिवेशनात महत्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या.
* इंग्लंड मध्ये होणाऱ्या परीक्षा हिंदुस्तानात घेण्यात याव्या. तसेच ज्या अधिकाऱ्याची पदे हि स्पर्धा परीक्षेने भरण्यात यावीत.
* भारतमंत्री व गवर्नर जनरल व गवर्नर यांच्या मध्ये व मंडळात हिंदी लोकांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे.
* केंद्रीय व प्रांतिक कायदेमंडळाची वाढ करून लोकांच्या प्रतिनिधीच्या संखेत भरीव वाढ करण्यात आली.
* लोकल व म्युनिसिपल संस्थावर सरकारचे जसे वर्चस्व असते. तसे वर्चस्व यांच्या वर नसावे.

सन १९०७ चे राष्ट्रीय सभेचे सुरत अधिवेशन 
* राष्ट्रसभेचे हे २३ वे अधिवेशन डिसेंबर १९०७ रोजी सुरु झाले.
* या सभेचे अध्यक्ष डॉ रासबिहारी घोष हे होते. व १६०० प्रतिनिधी या अधिवेशनात उपलब्द होते.
* राष्ट्र्सभेचे सुरत अधिवेशन हा राष्ट्रीय स्वतंत्र चळवळीतील महत्वाचा टप्पा मानला जातो.
* त्यावेळी सुरेंद्रनाथ यांनी ' फिरोजशहा मेथांची उक्ती चुकीची आणि लोकसत्तेची विसंगत अशी अरेरावीपणाची आहे ' अशी टीका केली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.