शनिवार, ६ फेब्रुवारी, २०१६

वेलस्लीची कारकीर्द सन [ १७९८ - १८०५ ]

वेलस्लीची कारकीर्द सन [ १७९८ - १८०५ ] 
* हिंदी लोकांच्या स्वास्थ्यासाठी इंग्रजांना एकछत्री अंमल हवा होता. असे त्याचे मत आहे. हिंदी राजांना आपल्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी  त्यांचा अधिकाधिक प्रदेश आपल्या ताब्यात आणण्यासाठी त्याने [ तैनाजी फौजेची योजना ] राबविली.

* वेलस्ली तैनाती फौजेची प्रथम निजामावर प्रयोग केला. निजामाने आपल्या पदरी असलेले फ्रेंच अधिकारी व फौज हाकलून देवून तैनाती फौज स्वीकारली व तिच्या खर्चाची रक्कम देण्याचेही मान्य केले. निजामाचे परराष्ट्र धोरण इंग्रज ठरवू लागले. त्यानंतर वेलस्लीने टिपुकडे मोर्चा वळविला. टिपुने फ्रेंचाशी संधान बांधले होते. त्याचा धोका वेळीच नष्ट करणे आवश्यक होते. म्हणून इंग्रज व निजाम यांच्या फौजावर टिपू चालून आला.

* ४ मे १७९९ च्या श्रीरंगपट्टमच्या लढाईत मारला गेला. इंग्रजांनी निजामाला गुप्ती व गुरुमकोंडा हे प्रदेश दिले व आपणाकडे कारवार, कोईमतूर, श्रीरंगपट्टम हा महत्वाचा प्रदेश घेतला.

* वेलस्लीच्या कारकिर्दीत दुसरे इंग्रज व मराठा युद्ध १८०२ - १८०४ घडून आले. या वेळी दुसरा बाजीराव पेशवेपदावर होता. वेलस्लीनंतर तटस्त धोरणाचा पुरस्कार करण्यासाठी लॉर्ड कॉर्नवॉलिसची हिंदुस्तानात दुसऱ्यांदा गवर्नर जनरल म्हणून नियुक्ती झाली. त्याच्या मृत्यूनंतर सर बार्लो १८०५ - १८०७ गवर्नर जनरल होता. बार्लो नंतर लॉर्ड मिंटो हा गवर्नर जनरल झाला. यांच्या कारकिर्दीत शीख राज्य यांच्यात सतलज हि हद्द ठरविण्यात आली. याच सुमारास विलायत सरकारने १८१३ चा चार्टर अक्ट पास करून कंपनीची हिंदुस्तानातील व्यापाराची मक्तेदारी नष्ट केली. आणि बोर्ड ऑफ कंट्रोलच्या मार्फत विलायत सरकार कंपनीच्या कारभारावर अंतिम अधिकार गाजवेल असे जाहीर करण्यात आले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.