गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०१६

रस

रस 

* शृंगाररस - स्त्री पुरुषांना एकमेकाबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून, आकर्षणातून या रसाची निर्मिती होते. उदा - डोळे हे जुलुमी गडे रोखुनी मज पाहू नका.

* वीररस - पराक्रम, शौर्य, धीरोदात्त, प्रसंग, यांच्या वर्णनातून वीररस निर्माण होते. उदा - आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी.

* करुणरस - शोक, किंवा दु:ख, वियोग, संकट यातून हा रस निर्माण होते आणि हृदयद्रावक अशा गोष्टीच्या वर्णानातून करुणारस निर्माण झालेला दिसतो. उदा - हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला.

* हास्यरस - विसंगती, असंबदध भाषण, विडंबन, चेष्टा, यांच्या वर्णानातून हास्यरस निर्माण होतो. उदा - उपास मज लागला, सखेबाई, उपास मज लागला.

* रौद्ररस - अतिशय क्रोध वा चीड या भावनेतून रौद्ररस निर्माण होतो. उदा - सह्याद्रीगिरीतील वनराजांनो या कुहारातुनी आज पुढे रक्त हवे जर स्वतंत्रतेला रक्ताचे पडतील सडे.

* भयानकरस - भीती या भावनेतून हा रस निर्माण होतो. युद्ध, मृत्यू, अपघात, आपत्ती, स्मशान, इत्यादीच्या वर्णानातून भय रस आढळतो. उदा - त्या ओसाड माळावर, दाट सावलीच्या पिपरणीखाली तो एकटा अगदी आणि रात्र अमावसेची होती.

* बिभत्सरस - किळस, वीट, तिटकारा, या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तेथे बीभत्सरस निर्माण होते. उदा - ही बोटे चघळीत काय बसले हे राम रे लाळ ही।

* अदभुतरस - विस्मय हा अदभूतरसाचा स्थायीभाव असून परीककथा, अरेबियन नाईट्स, राक्षसांच्या गोष्टी यामध्ये अदभूतरस आढळतो. उदा - यापरी नगरातले मग सर्व उंदीर घेवूनी, ठाकता क्षणी गारुडी नदीच्या तीरावर येवूनी, घेती शीघ्र उड्या पटापट त्या नदीमधी उंदीर, लोपला निमिषात संचय तो जळात भयंकर.

* शांतरस - परमेश्वरविषयक भक्ती, सत्पृषांची संगती, पवित्र वातावरणाचे वर्णन यात शांतरस आढळतो. उदा - आनंद न माय गगनी वैष्णव नाचती रंगणी!

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.