रविवार, १० जानेवारी, २०१६

महाराष्ट्रातील कर पद्धती ( Tax Systems ) (GST च्या विषयी)

महाराष्ट्रातील कर पद्धती ( Tax Systems )
अप्रत्यक्ष कर वसूल करण्यासाठी काही पद्धती असतात. महाराष्ट्रात आतापर्यंत पाच पद्धती झाल्या आहेत. सहावी मुल्य वर्धीत कर हि पद्धती आहे सुरु आहे.
महाराष्ट्रामध्ये विवध कर पद्धती - महाराष्ट्रात झालेल्या पद्धतीचा परिचय करून घेऊ या अशाच प्रकारच्या पद्धती अन्य राज्यात होत्या.
* पहिली पद्धत १ जानेवारी १९४६ ते ३१ डिसेंबर १९५२ या कालावधीत होती. तिला सिंगल पोइंट लास्ट स्टेज सिस्टीम असे म्हणतात. या पद्धतीत विक्रीच्या शृंखलेतील सर्वात शेवटचा विक्रेता वस्तू विकल्यावर विक्रीकर भरत असे.
* 1 जानेवारी १९५३ ते ३१ मार्च १९५४  कालावधीत आली. या पद्धतीला मल्टी पॉईट कर पद्धत असे म्हणतात. यामध्ये विक्रीच्या शृंखलेतील प्रत्येक टप्प्यावर कर लागत असे.
*  एप्रिल १९५४ ते ३१ डिसेंबर १९५९ डबल पॉईट पद्धत महाराष्ट्रात होती.
* १ जानेवारी १९६० ते ३० जून १९८० या काळात कम्पोझिट कर होता.
* १९८१ ते ३१ मार्च २००५ काळात सिंगल पॉईट फर्स्ट स्टेज हा कर होता.
* १ एप्रिल २००५ पासून मूल्यवर्धीत कर VAT हि कर पद्धत होती.
 वरील सर्व पद्धती बदलून वस्तू व सेवा कर अर्थात GST आनण्यासाठी हे बिल राज्यसभेत पास करण्यासाठी प्रदान केले आहे. लोकसभेत या बिलाला मंजुरी मिळाली आहे.
GST च्या विषयी -
वस्तू व सेवा कर GST वरील सर्व पद्धतीशिवाय वेगळी अशी पद्धती आहे. या पद्धतीमध्ये राज्य सरकारला सेवा कर लावण्याचा अशिकार मिळणार आहे. देशात सेवांच्या एकंदर उत्पनात ४०% भाग इतका आहे. तसेच केंद्र सरकारलाही विक्रीकर वसूल करण्याचा अधिकार या घटनादुरुस्ती मुले मिळणार आहे. यासाठी १२२ क्रमांकाची सुधारणा घटनेमध्ये करण्यासाठी १९ डिसेंबर २०१४ ला बिल मिळणार आहे. या घटना दुरुस्तीचा क्रमांक १९२ असून त्यामुळे GST कर भारतात पूर्णपणे आणता येईल सर्व प्रकारच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर रद्द होऊन GST आणला जाईल. यात अपवादात्मक रित्या आयकर व व्यवसाय कर मात्र कायम राहणार आहे.
वस्तू व सेवा करांची व्याख्या करतांना असे म्हंटले आहे कि कोणतेही वस्तू अथवा सेवा किंवा दोन्हीचा व्यवहार फक्त अल्कोहोलिक दारू वगळल्यास असा व्यवहार वस्तू व सेवा करामध्ये येईल तसेच सेवांचीही व्याख्या यामध्ये केली आहे. सेवा म्हणजे जय्मध्ये वस्तूंचा अंतर्भाव होणार नाही. असा निखळ सेवा व्यवहार होय. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.