गुरुवार, २१ जानेवारी, २०१६

शब्दयोगी अव्यय

शब्दयोगी अव्यय - जे शब्द सामन्यात: नामांना किंवा नामांचे कार्य करणाऱ्या शब्दांना संबंध जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दर्शवितात त्या अविकारी शब्दांना शब्दयोगी अव्यये म्हणतात.
उदा - घरासमोर, जूननंतर, मुर्खापुढे.

* उभयान्वयी अव्यये - प्रकार -
दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.

* प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये - उभयान्वयी अव्ययांनी जोडणारी वाक्ये एकमेकांवर अवलंबून नसतील तर अशा उभयान्वयी अव्ययांना प्रधानत्वसुचक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.

* प्रधानत्वसुचक उभयान्वयी अव्ययाचे प्रकार -
१]  समुच्चयबोधक अव्यय - आणि, वा, अन, न, शिवाय
२] विकल्पबोधक अव्यय - अथवा, किंवा, की, वा
३] न्यूनत्वबोधक अव्यय - पण, परंतु, परी, बाकी,
४] परिणामबोधक अव्यय - म्हणून, सबब, यास्तव,

* गौणत्वदर्शक उभयान्वयी अव्ययाचे प्रकार
१] स्वरूपबोधक उभयान्वयी - म्हणजे, की, जे
२] कारणबोधक उभयान्वयी - कारण, का, कि,
३] उद्देशबोधक उभयान्वयी - म्हणून, सबब, कारण, कि
४] संकेतबोधक उभयान्वयी - जर - तर, जरी - तरी, म्हणजे.

 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.