गुरुवार, २१ जानेवारी, २०१६

अव्यये

अव्यये 
अव्यय - अविकारी वाक्यात उपयोग करताना ज्या शब्दाच्या रुपात कोणताही बदल होत नाही त्यांना अव्यये म्हणतात.

[अविकारी शब्दाच्या जाती]
* क्रियाविशेषण अव्यय - क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदा - तो थोडा खातो. क्रियाविशेषण, तो मोठ्याने बोलतो. क्रियाविशेषण अव्यय.

* कालवाचक क्रियाविशेषण अव्यय -
१] कालदर्शक - आज, आता, उद्या, हल्ली,
२] सातत्यदर्शक - सदा, सर्वदा, सतत.
३] आवृत्तीदर्शक - दररोज, क्षणोक्षणी, वारंवार

* स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय -
१] स्थितिदर्शक - येथे, तेथे, वर, खाली,
२] गतिदर्शक - दूर, पुढून, मागून, इकडून,

* रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये -
वाक्यातील क्रिया कशी घडते हे दाखविणाऱ्या शब्दाला रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय. उदा - हळूहळू, सावकाश, उभ्याने, पटपट, जलद.

* परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय \ संख्या वाचक क्रियाविशेषण म्हणतात - थोडा, अगदी, मुळीच, भरपूर, मोजके, पूर्ण, अतिशय, बिलकुल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.