गुरुवार, २१ जानेवारी, २०१६

शब्दाच्या जाती

शब्दाच्या जाती 
विकारी [सव्यय ] - नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद
अविकारी [अव्यय] - क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यव्य, उभयान्वयी अव्यव्य, केवलप्रयोगी अव्यव्य.

* नाम - प्रत्यक्षात असलेल्या किंवा कल्पित वस्तू किंवा त्याच्या गुणधर्माना दिलेल्या नावांना नाम म्हणतात. उदा - गोपाल.
* सर्वनाम - नामाएवजी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला 'सर्वनाम' असे म्हणतात. उदा - मी, तू ती ते कोण.
* विशेषण - जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना विशेषण म्हणतात. उदा - सुंदर, गोड
* क्रियापद - वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्दाला 'क्रियापद' असे म्हणतात. उदा - वाचतो, खेळतो.

नामाचे प्रकार 
* सामान्य नाम - एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य जाते. त्याला ' सामान्य नाम असे म्हणतात. उदा - समूह, पर्वत, देश, गाय.

* विशेष नाम - ज्या नामाने संपूर्ण जातीचा बोध होत असून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात. उदा -  सुरेश, कपिला, हिमालय, भारत.

* भाववाचक नाम - प्राणी व वस्तू यांच्यातील गुण धर्म किंवा भाव याचा बोध होणाऱ्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात. यालाच धर्मवाचक नाम असे म्हणतात. उदा - नाविन्य, थोरपण, उदारता, चपकाई.

* धातुसाधित नाम - धातुसाधित तयार झालेल्या नामाला धातुसाधित नाम असे म्हणतात.
उदा - त्याचे वागणे विक्षिप्त आहे [ वाग हा धातू आहे.]

धातुसाधिते कृदन्ते
क्रियापदातील प्रत्ययरहित मुल शब्दाला [धातू] असे म्हणतात.
१] ती शाळेत जाते. मूळधातू [जा]

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.