गुरुवार, २८ जानेवारी, २०१६

वृत्ते

 वृत्ते 
* वृत्ते हा भाग व्यवस्थित समजण्यासाठी खालील महत्वाचे घटक लक्षात ठेवणे आवश्यक आहे. 
* गद्य - आपल्या मनातील विचार आपण जसे बोलतो तसे सरळ बोलून दाखविणे याला गद्य असे म्हणतात. उदा - आज गोकुळात हरी रंग खेळत आहे, त्यामुळे राधिके तुझ्या घरी जर जपून जा. 
* आपल्या मनातील ठराविक क्रमाने लिहून सुरावर / चालीवर म्हणता येतील याप्रमाणे रचना करणे म्हणजे पद्य होय. 
उदा - आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी.  

पद्यरचनेचे प्रमुख तीन प्रकार आहेत - छंद, अक्षर गणवृत्ते, मात्रावृत्ते. 
छंद - छंदाची खालील दोन गटात विभागणी होते. 

* छंदवृत्त - प्रत्येक ओळीतील अक्षरसंख्या ठराविक असते. अक्षरे ऱ्हस्व दीर्घ कशीही लिहिलेली असली तरी छदो वृत्तात प्रत्येक अक्षर बहुधा दीर्घ उच्चारले जाते. [ उदा - ओवी, अभंग पहिली माझी ओवी। पहिला माझा नेम।। तुळशीखाली राम। पोथी वाचा।।

* मुक्तछंद - ज्या पद्यरचनेत चरण संख्या, गण, अक्षर संख्या, लगक्रम किंवा मात्रा यापैकी कोणतेच ठराविक बंधन नसते त्यास मुक्तछंद असे म्हणतात. [ उदा - देवा ह्याही देशात पाऊस पाड, जिथे पाण्याला येतो खुनाचा वास, जिथे हिंसेच्या मळ्यात पिकतो उस किंवा ताग, देवा जोवर आहेस तोवर निषिद्ध आहे वैताग.]

* अक्षरगणवृत्त - ज्या रचनेतील प्रत्येक ओळीत अक्षरांची संख्या सारखी असते. ओळीतील अक्षरांचा लघु, गुरु, क्रम सारखा असतो, यातिस्थाने समान असतात. त्यास अक्षरगणवृत्त असे म्हणतात. [ जो नित्य देवास भजे स्वभावे, त्या मानवा देव सदैव पावे.]

वृत्तासंबंधी महत्वाच्या बाबी 

* मात्रा - एखाद्या अक्षराच्या उच्चार करण्यास जो कालावधी वेळ लागतो त्यास मात्रा असे म्हणतात. ऱ्हस्व अक्षराची एक मात्रा तर दीर्घ अक्षराच्या दोन मात्रा मानतात. [क = १, म = १, ला = २ मात्रा वापरतात.]

* लघु गुरु - ऱ्हास्व अक्षरांना लघु तर दीर्घ अक्षरांना गुरु म्हणतात. लघु अक्षर अर्ध चंद्राकृती [U] चिन्हाने दाखवतात. तर गुरु अक्षर आडव्या रेषेने [-] दर्शवितात.
* लघुअक्षरे - अ, इ, उ, ऋ, तसेच हे स्वर मिसळून तयार झालेल्या अक्षरांना उदा - क, कि, कु, लघु अक्षरे म्हणतात.
* गुरु अक्षरे - आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ, हे दीर्घ स्वर व हे स्वर मिसळून तयार झालेली अक्षरे जसे कि का, की, कू, के,कै, को, कौ, यांना गुरु अक्षरे म्हणतात.
* लगक्रम - लघु गुरूच्या क्रमालाच लगक्रम असे म्हणतात.

लघुक्रम - गुरु ओळखण्याचे नियम 
* जोडाक्षारापुर्वी लघु अक्षरावर जोर/आघात येत असेल तर ते गुरु मानावे, नसेल तर लघु मानावे.
* जोडाक्षरातील शेवटचा वर्ण ऱ्हस्व असेल तर जोडाक्षर लघु मानावे.
* जोडाक्षरातील शेवटचा वर्ण दीर्घ असेल तर ते गुरु मानावे.
* लघु अक्षरावर अनुस्वार किंवा विसर्ग येत असेल तर ते गुरु मानावे.
* कवितेच्या चरणाच्या शेवटी येणारे लघु अक्षर दीर्घ उच्चारले जाते म्हणून ते गुरु मानावे.
* काही वृत्ताच्या चरणात तीन तीन अक्षरांचे गट पाडल्यावर शेवटी एक किंवा दोन अक्षरे राहतात. त्यातील लघुला ल तर गुरूला ग असे नाव द्यावीत.

यती - कवितेचे चरण म्हणतांना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो. या थांबण्याच्या जागेला किंवा विरामाला यती असे म्हणतात. शब्दाच्या मध्येच थांबावे लागत असेल तर त्यास यतिभंग म्हणतात.

गण - वृत्ताची लक्षणे ठरविताना लघुगुरू क्रम मांडून अक्षरांची तीन तीनच्या गटात जी विभागणी केली जाते त्याला गण असे म्हणतात. कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप म्हणजे गण होय.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.