गुरुवार, २१ जानेवारी, २०१६

विशेषणे

विशेषणे - नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दास विशेषण असे म्हणतात.
* गुणविशेषण - नामाचा गुण किंवा विशेष गुण दाखवणाऱ्या विशेषणाला गुणविशेषण असे म्हणतात. उदा - कडू, गोड, हुशार,

* संख्याविशेषण -  नामाची संख्या दाखविणाऱ्या विशेषणाला ' संख्याविशेषण ' असे म्हणतात.
१] पाच पांडव - गणवाचक
२] पहिला तास, तिसरी इयत्ता - क्रमवाचक
३] द्विगुणीत आनंद, चौपट - आवृत्तिवाचक
४] एकेक ओळ, पाचपाचचागट - पृथक्वत्वाचक वाचक
५] सर्व मुले, काही माणसे, इतर वस्तू, - अनिश्चित

* सार्वनामिक विशेषण - नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या सर्वनामाला ' सार्वनामिक विशेषण ' असे म्हणतात. उदा - माझे घर, हे पुस्तक, कोणती गोष्ट,
१] नामसाधित विशेषण - तो फळ [विक्रेता] आहे. तिला [बनारसी] शालू आहे.
२] धातुसाधित विशेषण - धातूंना प्रत्यय लागून जे विशेषणे कार्य करतात त्यांना धातुसाधित म्हणतात. उदा - बोलक्या, बाहुल्या, गाणारा पक्षी.
३] अव्ययसाधित विशेषणे - खालचा, पुढील, मागील.    

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.