शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६

प्रयोग

प्रयोग
कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जी रचना, जुळणी असते तिला व्याकरणात क्रियापदाचे असे म्हणतात.

* प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार
१] कर्तरी प्रयोग - जेव्हा वाक्यातील क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग वचन व पुरुषाप्रमाणे बदलते. तेव्हा ते वाक्य कर्तरी प्रयोगाचे असते.

कर्तरी प्रयोगाचे प्रकार
* सकर्मक कर्तरी - ज्या  वाक्यात कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते त्या वाक्याला सकर्मक कर्तरी असे म्हणतात. उदा - मांजर दुध पिते.

* अकर्मक कर्तरी - ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यातील क्रियापद अकर्मक असतो. ते वाक्य अकर्मक कर्तरी होय.
उदा - मी बागेत पडलो.

* कर्तरी प्रयोग ओळखण्याची खून - कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथमांत असतो. व कर्म हे प्रथमांत किंवा द्वितीयांत असते.
* सामन्यात: वाक्यातील कर्त्याला व कर्माला प्रत्यय लागलेला नसल्यास ते वाक्य सकर्मक कर्तरी प्रयोगाचे.
* वाक्यात कर्म नसेल व कर्त्याचा प्रत्यय नसल्यास ते वाक्य अकर्मक कर्तरी प्रयोगाचे.

* कर्मणी प्रयोग 
वाक्यातील क्रियापद कर्मानुसार बदलत असेल तर ते वाक्य कर्मणी प्रयोगाचे आहे असे समजावे.
उदा - मधूने पुस्तक वाचले.

* कर्मणी प्रयोग ओळखण्याची खून - वाक्यातील कर्म प्रथमांत असते. म्हणजेच कर्माला प्रत्यय नसतो. तर कर्त्याला प्रत्यय लागलेला असतो. कर्ता तृतीयान्त चातुर्यंत किंवा शब्दयोगी अव्ययात असतो.

* भावे प्रयोग - 
जेव्हा वाक्यातील क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन व पुरुषाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असे स्वतंत्र असते. वाक्य भावे प्रयोगाचे असते. उदा - गुरुजींनी मुलांना शिकवले.

* सकर्मक भावे प्रयोग - उदा - पोलिसाने चोरास पकडले.
* अकर्मक भावे प्रयोग - उदा - त्याला इकडे बोलवावे.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.