बुधवार, २० जानेवारी, २०१६

मराठी व्याकरण - वर्णविचार

मराठी व्याकरण - वर्णविचार 
* आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीना वर्ण असे म्हणतात. उदा क, ख, घ, ग.
* मराठी भाषेत एकूण ४८ वर्ण आहेत.
* एकूण स्वर १२ आहेत.
* स्वरादी २ आहेत.
* मराठी भाषेत एकूण व्यंजने ३४ आहेत.
स्वर 
* ऱ्हस्व - अ इ उ ॠ ऌ
* दीर्घ - आ ई ऊ
* संयुक्त - ए [अ +ई ] ऐ ओ औ
व्यंजने 
* कठोर - क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ,
* मृदू - ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब, भ,
* अनुनासिक - ड़, न, ण, म,
* अर्धस्वर - य, र, ल, व,
*  उष्मा - श, ष, स,
* महाप्राण -  ह,
* स्वतंत्र - ळ,
* क्ष व ज्ञ हि दोन जोडव्यंजने आहे.
* क्ष = क + ष,  ज्ञ = द + न + य
* कंठ्य - क, ख, ग, घ, ड़, ह, - अ, आ.
* तालव्य - च, छ, ज, ज्ञ, य, श, - इ, ई
* मृधन्य - ट, ठ, ड, ढ, ण,
* दंत्य - त, थ, द, ध, न, ल, स, - ऌ
* औष्ठय - प, फ, ब, भ, म, - उ, ऊ,
* कंठ  तालव्य - ए, ऐ
* कंठोष्ट्य - ओ, औ,
* दंतोष्ठ्य - व,
* दंत तालव्य - च, छ, झ,

संयुक्त स्वर 
ए = अ + इ किंवा औ = आ +उ = उ
* सजातीय स्वर - एकाच उच्चारस्थानापासून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. उदा - अ - आ
* विजातीय स्वर - भिन्न उच्चार स्थानापासून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. उदा - अ - उ
* अनुनासिके - ड़, न, ण, आणि म, या वर्णाचा ऊच्चार हा त्या वर्णाच्या उच्चारस्थानाबरोबर नासिकेतून होतो. म्हणून त्यांना अनुनासिके असे म्हणतात.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.