गुरुवार, २८ जानेवारी, २०१६

शब्दसिद्धी

शब्दसिद्धी - शब्दाची उत्पत्ती कशी झाली आहे. म्हणजेच शब्द कसा तयार झाला आहे. यालाच शब्दसिद्धी  म्हणतात. मराठी भाषेत जसे मूळशब्द आहेत तसेच इतर भाषातून आलेले शब्द आहेत.

तत्सम शब्द - संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीत आलेल्या म्हणजेच त्यांच्या मूळ रुपात बदल न झालेल्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात.

* तत्सम शब्द पुढीलप्रमाणे - राजा, मंदिर, गुरु, भगवान, कन्या, महर्षी, सन्मति, धर्म, दुष्परिणाम, संत, तिथी, जल, मंत्र, पृथ्वी, उपकार, घंटा, भोजन, नैवेद्य, निस्तेज, सूर्य, पत्र, शिखर, देवर्षी, परंतु, पुण्य, प्रकाश, कर, स्वल्प, सूत्र, वृद्ध, गायन,
बुद्धी, सत्कार, जगन्नाथ, घृणा, उत्तम, कार्य, संसार, अश्रू, तट्टीका, देवालय, कवी, मधु, पिता, होम, भूगोल, प्रसाद, वृक्ष, तारा, गंध, पिंड, ग्रंथ, पुत्र, प्रित्यर्थ, यथामती, अभिषेक, समर्थन, दर्शन, कलश, निर्माल्य, भीती, पुरुष, अब्ज, संगती, नयन, उमेश, प्रातकाळ, आकाश, गणेश, विद्वान, भोजन, श्राद्ध, पुष्प, स्वामी, दंड, पाप, सभ्य, कविता, यद्यमि, नृप, उत्सव,

* तदभव शब्द - संस्कृतमधून मराठीत येताना ज्या शब्दाच्या रुपात बदल झाला आहे त्यांना तदभाव शब्द असे म्हणतात.

* तदभाव शब्द पुढीलप्रमाणे - गृह - घर,  ग्रास - घास, अज्ञानी - अडाणी, धुम्र - धूर, कोमल - कोवळा, कर्ण - कान, दिप - दिवा, मर्कट - माकड, स्वसु - सासू, अंध - आंधळा, पय - पाय, तक्र - ताक, भ्राता - भाऊ, मुल - मूळ, तृण - तण, अग्री - आग, उद्यम - उद्योग, पंक - पंख, हस्त - हात, ग्राय - गाय, अश्रू - आसू, कंटक - काटा, पेटिका - पेटी, पर्ण - पाण, चक्र - चाक, पाद - पाय, अंजुली - ओंजळ, क्षेत्र - शेत, दुग्ध - दुध, विनती - विनंती, शीर्ष - शीर, दिप - दिवा, मूल - मूळ,

* देशी शब्द  - जे शब्द मुल महाराष्ट्रातील रहीवाशांच्या बोलीभाषेत मानले जातात त्यांना देशी शब्द म्हणतात.

* घोडा, पोट, गार, धोंडा, ढेकुण, ओटा, लाकूड, डोके, झोप, लुगडे, वांगे, उनागडी, अबोला, झाड, डोंगर, रेडा, पोरकट, लुट, फटकळ, खुळा, ओटी, अंघोळ, रोग, दगड, कंबर, उडी, ओढा, डोळा, पीठ, शेतकरी, चोर, अवकळा, चिमणी, धपाधप, वारकरी, लाजरा, बोका, आजार, मळकट, वेढा, गुडघा, धड.

* परभाषीय शब्द - संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषामधून मराठीत शब्द आलेले आढळतात.

* कानडी शब्द - भाकरी, किल्ली, चिमटा, काका, तूप, चाकरी, दाभण, टाळू, कुंची, तंदूर, गाजर, गादी, कांबळे, आई, नथ, खिडकी, अक्का, रजई, बांगडी, गच्ची, चिमटा, अडकित्ता, चिंच, हंडा, बांबू, खलबत्ता, खोबरे, उडीद, चिरगुट, विळी, कणिक, पाट, अप्पा, ताई.

* गुजराथी - दादर, घी, शेट, डबा, दलाल, रिकामटेकडा,

* इंग्रजी शब्द - एजंट, टेबल, बस, डॉक्टर, सायकल, रेडीओ, टेलिफोन, सिनेमा, सर्कस, फाईल, स्टेशन, मास्तर, पार्सल,
बॉल,

* हिंदी - दिल, करोड, दाम, बात, भाई, और, बच्चा, मुहावरा, नानी, इमली,

* पोर्तुगीज - बटाटा, तंबाखू, घमेले, पगार, बिजागिरी, कोष्टी, फणस, हापूस, पायरी, कोबी, मेज, लोणचे, बिस्कीट.

* फारसी - हकीकत, सामना, पोशाख, पेशवा, खाना, अब्रू, अत्तर, सौदागर, कामगार, फडणवीस, गुन्हेगार, शरमिंदा, नोकरी, गजल, दिवाणखाना, गुलाब, बारदान,


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.