बुधवार, २० जानेवारी, २०१६

संधी, स्वरसंधी

संधी - जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांत मिसळून या दोहोबद्दल एक वर्ण तयार होतो त्या वर्णाच्या एकत्र येण्यास संधी असे म्हणतात.

स्वरसंधी - दोन स्वर एकमेकाजवळ आले कि ते दोन स्वर एकत्र येवून त्यांचा एक स्वर बनतो त्यास स्वरसंधी असे म्हणतात.
* नियम - दोन सजातीय स्वर एकापुढे एक आले असता त्यांचा संधी होऊन दोहोबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो यालाच दीर्घसंधी असे म्हणतात. उदा - देव + आलय = देवालय

* नियम - अ किंवा आ यांच्यापुढे इ किंवा ई आल्यास त्या दोहोएवजी ए येतो. उ किंवा ऊ आल्यास ओ येतो आणि ऋ       आल्यास अर येतो. उदा - यथा + इष्ट = यथेष्ट.

* नियम -  अ किंवा आ यांच्यापुढे ए किंवा ऐ हे स्वर आल्यास त्या दोहोबद्दल ऐ येतो आणि ओ किंवा औ आल्यास त्याबद्दल औ  येतो. उदा - सदा + एव = सदैव.

* नियम - इ-ई, उ-ऊ, या स्वरापुढे विजातीय स्वर आल्यास इ बद्दल य हे आदेश येतात आणि त्यात पुढील स्वर मिळून संधी होतो. उदा - अती + आनंद = अत्यानंद.

* नियम - ए, ऐ, ओ, औ या स्वरापुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास त्यांच्याबद्दल अनुक्रमे अय, आय, अव, असे आदेश येतात व पुढील स्वर त्यात मिसळून संधी होते. उदा - ने + अन = नयन.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.