गुरुवार, २८ जानेवारी, २०१६

अलंकार

अलंकार 
* भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेल्या तंत्राला भाषेचे अलंकार असे म्हणतात.
* भाषेचे दोन अलंकार १] शब्दालंकार २] अर्थालंकार

शब्दालंकार - शब्दालंकार खालीलप्रमाणे आहेत.

* अनुप्रास - कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती, होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होते. [उदा - देवा दीनदयाळा। दूर द्रुत दास, दु:ख दूर, दवडी शांतीच मज दे - - - -]

* यमक - वेगवेगळे अर्थ असणाऱ्या परंतु उच्चारात समानता असणाऱ्या शब्दाचा वापर चरणात ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होऊन, जे सौदर्य प्राप्त होते, त्यास यमक असे म्हणतात. [उदा - सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो। कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो।]

* श्लेष अलंकार - या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो. [उदा - हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस. आयुष्य, पाणी ]

अर्थालंकार - या प्रकारात वाक्यातील अर्थामुळे भाषेला सौदर्य प्राप्त होते.

* उपमा - दोन वस्तुमधील साध्यर्म दाखवण्यासाठी सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, परीस, सारख्या शब्दांचा वापर केल्यास उपमा अलंकार होतो.[उदा - असेल तेथे वहात सुंदर दुधासारखी नदी.]

* उत्प्रेक्षा - उपमेय हे जणू उपमानच आहे, असे दर्शविण्यासाठी जणू, जणुकाय, गमे, वाटे, भासे, कि यासारखे शब्द वापरले जाते तेव्हा हा अलंकार होतो. [दा - हा आंबा जणू साखरच. ]

* आपन्हुती - आपन्हुतीचा अर्थ लपविणे असा होतो. यात उपमेय लपवून ते उपमानच आहे असे दर्शविले जाते.
[उदा - हा आंबा नाही, साखरच आहे.

* अनन्वय - ज्या वेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही. म्हणून ती उपमेयाबरोबरच केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. एखाद्या घटकाची तुलना त्याच्या स्वत:बरोबरच करणे. [उदा - आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्यापरी।]

* रूपक - जेव्हा उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असे दर्शविले जाते तेव्हा रूपक अलंकार होते. [ उदा - तुकड्या म्हणे तू घरटे होय तेव्हा पांग फिटे]

* अतिशयोक्ती - एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे, याला अतिशयोक्ती असे म्हणतात.
[ उदा - जो अंबरी उफळता खुर लागलाहे तो चंद्रमा नीज तनुवरि डाग लाहे ]

* दृष्टांत - एखादा विषय पटवून सांगण्यासाठी एखादा दाखला दिल्यास दृष्टांत अलंकार होतो. हा अलंकार साधर्म्यवर आणि वैधम्यावर भेद दर्शवितो. [उदा - लहानपण दे गा देवा। मुंगी साखरेचा रवा।]

* विरोधाभास - वरकरणी विरोध; पण वास्तविक तसा विरोध नसतो तेव्हा विरोधाभास अलंकार असे म्हणतात. [ उदा - जरी आंधळी मी तुला पाहते]

* चेतनागुणोक्ती -  निर्जीव तसेच मानविकृत कल्पना या सजीवाप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप केला जातो तेव्हा चेतनगुणोक्ती अलंकार होतो. [ उदा - कुटुंब वत्सल इथे फणस हा । कटीखांद्यावर घेवून बाळे ]

* अर्थान्तरन्यास -  एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणवरून सामान्य सिद्धांत काढला जातो. तेव्हा अर्थान्तरन्यास अलंकार होतो. [ उदा - कठीण समय येता कोण कामास येतो ?]

* स्वभावोक्ती - जेव्हा कोणताही प्राणी, स्थळ, वस्तू, व प्रसंगाचे हुबेहूब, पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केले जाते. तेव्हा हा अलंकार येते. [ उदा - मातीत पसरले ते अतिरम्य पंख, केले वरी उदार पांडूर निष्कलंक.


                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                     


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.