गुरुवार, २१ जानेवारी, २०१६

क्रियापदाचे अर्थ

क्रियापदाचे अर्थ - क्रियापदाच्या रूपावरून केवळ काळाचा बोध न होता आज्ञा, विनंती, उपदेश, कर्तव्य, इच्छा, संकेत, भावार्थ व्यक्त होते.

* स्वार्थ - ज्या वाक्यातील क्रीयापादावरून केवळ काळाचा बोध होतो. त्यास स्वार्थी क्रियापद म्हणतात. क्रियापदातील सर्व काळातील रूपे हि स्वार्थी आहे. राजू अभ्यास करतो. तो सहलीला गेला.

* अद्यार्थी - ज्या क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, अनुमोदन किंवा उपदेश याचा बोध होते. त्यास अद्यार्थी क्रियापद म्हणतात.

* विध्यर्थी - ज्या क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा, या गोष्टीचा बोध होतो. त्यास विध्यर्थ क्रियापद म्हणतात. मुलींनी शिस्त पाळावी, तो कदाचित बागेत असावा.

* संकेतार्थ - जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून अमुक केले असते. तर अमुक झाले असते. असा संकेतार्थ अर्थाचा बोध होतो तेव्हा त्यास संकेतार्थी क्रियापद असे म्हणतात. उदा [ प्रयत्न केले तर यश मिळेलच] [ काही झाले तरी मी बोलणारच]0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.