बुधवार, २० जानेवारी, २०१६

विसर्गसंधी

विसर्गसंधी - एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन  असल्यास होणाऱ्या संधीला विसर्ग संधी असे म्हणतात.
* नियम १ - विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व तो मागील अ मध्ये मिळून त्याचा ओ होतो यालाच विसर्ग उकार संधी असे म्हणतात. उदा - मनोरंजन मन: +रंजन.

* नियम २ - [विसर्ग र संधी] - विसर्गाच्या मागे अ, आ, खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र घेऊन संधी होते.

* नियम ३ - विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे क, ख, प, फ, यापैकी एखादे व्यंजन आल्यास विसर्ग कायम राहतो . उदा - अध:पात = अध:+पात

* नियम ४ - विसर्गाच्या मागे इ किंवा उ असून पुढे क प फ हे वर्ण आले तर विसर्गाचा ष होऊन संधी होते. उदा - निष्कर्ष- नि +श +कर्ष

* नियम ५ - विसर्गाच्या पुढे कृ धातूची रूपे आल्यास विसर्गाचा स होऊन संधी होते. उदा पुरस्कार - पूर:+कार - पूर+स+कार

* नियम ६ - विसर्गाच्या पुढे च, छ, आल्यास विसर्गाचा श होतो. उदा निश्चल - नि:+चल, नि + श + चल     

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.