गुरुवार, २१ जानेवारी, २०१६

सर्वनाम

सर्वनाम 
सर्वनामाचे प्रकार 
* पुरुषवाचक सर्वनामे -
पुरुषवाचक     एकवचन     अनेकवचन
प्रथम                 मी             आम्ही
द्वितीय               तू               तुम्ही
तृतीय            तो,ती,ते,      ते, त्या, ती,

* दर्शक सर्वनामे - जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्वनामाला दर्शक सर्वनाम असे म्हणतात. उदा - हा, ही, हे, तो, ती, ते,

* संबंधी सर्वनामे - वाक्यात दर्शक सर्वनामाचे संबंध दाखविणाऱ्या सर्वनामाना संबंधी सर्वनामे असे म्हणतात. उदा - जो, जी, जे, ज्या,

* प्रश्नार्थक सर्वनामे - प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात. उदा - कोण, कोणास, कोणी, काय,

* सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे - उदा - [कोणी] केले ते मला माहित नाही.

* आत्मवाचक सर्वनामे - स्वत:च्या या अर्थी वापरण्यात येणाऱ्या सर्वनामाला आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. उदा - स्वतः, निज, आपण, आपणहून,

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.