शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६

सामान्यरूपे

सामान्यरूपे - शब्दांना प्रत्यय लागत असताना त्यांच्या मूळरुपात बदल होतो. त्याला त्या शब्दाचे सामान्यरूपे म्हणतात.
उदा - डोह - डोहात, घोडा - घोड्यात, पान - पानात, सामान्यरूपे होण्याचे सर्वसामान्य नियम

* पुलिंगी नामांची सामान्यरूपे
१] अकारान्त पुलिंगी नामाचे सामान्यरूपे आकारांत होते. बैल - बैलाला.
२] आकारांत व एकारान्त पुलिंगी नामाचे सामान्यरूपे 'याकारांत' होते. मळा - मळ्यात
३] इकारांताचे - याकारांत होते. उदा - शेतकरी - शेतकऱ्याला.
४] परंतु तत्सम इकारान्त व उकारान्ताचे शब्दाचे सामान्यरूप दीर्घान्त. कवी - कवीला.
५] उकारान्तचे चे वाकरान्त भाऊ - भावाने
६] ओकारान्ताचे - ओकारांतच राहते. किलो - किलोस.

* स्त्रीलिंगी नामांची रूपे
१] आकारांत चे एकारांत व अनेकवचनात आकारांत होते. वाट - वाटेत
२] आकारांत चे इकारांत होते. गाय - गाईला.
३] आकारांत चे एकारान्त होते. दिशा - दिशेला
४] इकारान्त स्त्रीलिंगीचे एकवचन इकारान्त अनेकवचनात आकारांत होते. पेटी - पेटीत
५] उकारांतचे वाकारांत होते. सासू - सासूला - सासवांना
६] ओकारान्त्चे - आकारांत होते. बायको - बायकोचा

* नपुसकलिंगी नामांची सामान्य नामे
१] आकारान्तचे आकारांत होते. झाड - झाडाचे
२] इकरान्ताचे याकारांत होते. लोणी - लोण्याचा
३] एकारांताचे याकारांत होते. गाणे - गाण्यात
४] उकारान्तचे आकारांत होते. शिंगरू - शिंगराला
५] काही उकारांत वाकारांत होते. कुंकू - कुंकुवाचा

* सा आल्यास शा होते
* पैसा - पैशाने
* क किंवा प चे द्वित असल्यास निघून जाते.
* म पूर्वीचे अनुस्वारसहित अक्षर अनुस्वार विरहीत होते. किमंत - किमतीला, गंमत - गमतीचा.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.