बुधवार, २० जानेवारी, २०१६

व्यंजनसंधी

व्यंजनसंधी - जवळ जवळ येणाऱ्या वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजने किंवा दुसरा वर्ण स्वर त्यास व्यंजनसंधी असे म्हणतात.

* नियम १ - [ प्रथम व्यंजन संधी ] - पहिल्या पाच वर्णापैकी क पासून म पर्यंतच्या २५ व्यजनापैकी अनुनासिकाखेरीज कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाबद्दल त्यांच्यात वर्गातील पहिले कठोर व्यंजन येवून संधी होते. यालाच प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात. [उदा - क्षुध+पिपासा]

* नियम २ - [अनुनासिक संधी] - पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक येवून संधी होते. उदा - सन्मार्ग - सत + मार्ग.

* नियम ३ - [तृतीय व्यंजन संधी ] - पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्याच्या पहिल्या व्यंजनाएवजी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येवून संधी होते. याला तृतीय व्यंजन संधी म्हणतात.
उदा - दिक + अंबर = अंबर

* नियम ४ - त या व्यंजनापुढे
१] त या व्यंजनापुढे च, छ, आल्यास त बद्दल च होणे [सच्चरित्र = सत + चरित्र,]
२] त या व्यंजनापुढे ज झ आल्यास त बद्दल ज होतो. [उज्ज्वल = उत + ज्वल.]
३] त या व्यंजनापुढे ट ठ आल्यास त बद्दल ट होतो. [तट्टीका = तत +टिका]
४] त या व्यंजनापुढे ल आल्यास त बद्दल ल होतो. [तल्लीन = तत + लीन ]
५] त या व्यंजनापुढे श आल्यास त बद्दल च होतो [सच्छिल = सत + शील]
६] म पुढे स्वर आल्यास तो मागील म मध्ये मिसळून जातो व म पुढे व्यंजन आल्यास म बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येतो.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.