शुक्रवार, २९ जानेवारी, २०१६

अलंकारिक शब्द

अलंकारिक शब्द 
अष्टपैलू - सर्वगुणसंपन्न
अकरावा रुद्र - अतिशय तापट माणूस
अकलेचा कांदा - मूर्ख
अकलेचा कांदा - अत्यंत मूर्ख माणूस
अरण्य रुद्रण - ज्याचा उपयोग नाही असे कृत्य
गाजरपारखी - कसलीही पारख नसलेला, मूर्ख
गुरुकिल्ली - मर्म, रहस्य
अक्षरशत्रू - निरक्षर, अडाणी
ओनामा - सुरुवात, प्रारंभ
घरकोंबडा - घराबाहेर न पडणारा
चर्पटपंजरी - निरर्थक बडबड
कळीचा नारद - कळ लावणारा
काडीपहिलवान - हडखुळा
ताटाखालचे मांजर - दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागणारा
कोल्हेकाई - क्षुद्र लोकांची बडबड
खडाजंगी - मोठे भांडण
खडाष्टक - जोरदार भांडण
धोपट मार्ग - सरळ, नेहमीचा मार्ग
पांढरा परिस - लबाड
बोलाचीच कढी - केवळ शाब्दिक वचणे
खुशाल चेंडू - चैनखोर माणूस
खेटराची शब्द - अपशब्दाने खरडपट्टी काढणे
गडांतर - भीतीदायक संकट
अळवावरचे पाणी - फार काळ न टिकणारे
टोळभैरव - कामात नासाडी करणारे लोक
कुपमंडूक - संकुचित वृत्तीचा
नवकोट नारायण - खूप श्रीमंत
पर्वणी - अतिशय दुर्मिळ योग
पांढरा कावळा - निसर्गात नसलेली वस्तू
बोकोसंन्यासी - ढोंगी मनुष्य
भगीरथ प्रयत्न - आटोकाट प्रयत्न
मायेचा पूत - पराक्रमी मनुष्य, मायाळू4 टिप्पणी(ण्या):

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.