गुरुवार, २१ जानेवारी, २०१६

क्रियापदे

क्रियापदे 
क्रियापद - म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द.
धातू - क्रियापदातील प्रत्यारहित मूळ शब्द म्हणजे धातू
धातुसाधिते - धातूला विविध प्रत्यय लावून अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना कृदन्ते असे म्हणतात.

क्रियापदाचे प्रकार
* सकर्मक क्रियापद - ज्या क्रियापदाचा अर्थ पुरा होण्यास कर्माची गरज लागते. त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात. उदा - त्याने पुस्तक फाडले. सकर्मक क्रियापद [ या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास 'पुस्तक' या कर्माची जरुरी आहे.]

* अकर्मक क्रियापद - कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्याशीच थांबत असेल किंवा कर्त्याच्या ठिकाणी लय पावत असेल तर त्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद असे म्हणतात.
उदा - ती सुंदर [दिसते].

* संयुक्त क्रियापद - धातुसाधित व सहाय्य क्रियापद यांच्या संयोगाने बनलेल्या क्रियापदाला ' संयुक्त क्रियापद ' म्हणतात.
उदा - तो सारखा खेळत असतो. [खेळत धातुसाधित] [असतो -सहाय्यक क्रियापद ]

* प्रयोजक क्रियापद - जेव्हा वाक्यातील क्रियेचा कर्ता ती क्रिया दुसऱ्याकडून करवतो. तेव्हा त्या क्रियापदाला ' प्रयोजक ' क्रियापद असे म्हणतात. उदा - विदुषक प्रेक्षकांना हसवतो. [ हसवतो हे प्रयोजक क्रियापद ]

*  शक्य क्रियापद - जो धातू कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे असे दाखवितो त्याला शक्य क्रियापद म्हणतात. उदा - मला आता थोडे चालवते [ चालवते हे शक्य क्रियापद ]

* अनियमित क्रियापदे - निश्चितपणे सांगता न येणाऱ्या क्रियापदांना अनियमित क्रियापदे असे माहतात.
उदा - त्याने खोटे बोलू नये. [ नये हे अनियमित क्रियापदे ]

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.