गुरुवार, २८ जानेवारी, २०१६

अलंकार २

अलंकार २ 
* व्याजस्तुती -  बाहेरून स्तुती पण आतून निंदा किंवा बाहेरून निंदा पण आतून स्तुती असेल तर व्याजस्तुती अलंकार होतो. [उदा - होती वदन चंद्राच्या दर्शनाचीच आस ती । अर्धचंद्र तू द्यावा, कृपा याहून कोणती ।।

* पर्यायोक्ती - एखादी गोष्ट सरळ शब्दात सांगता ती अप्रत्यक्षपणे सांगणे याला पर्यायोक्ती म्हणतात. [ उदा - तू तर उंबराचे फुल आणायला सांगितलेस [अशक्य गोष्ट]]

* सार अलंकार - वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा सार हा अलंकार होतो. [ उदा - अधीन मर्कट तशातही मद्य प्याला, झाला तशात जरी वृशिक दंश त्याला.]

* अन्योक्ती - दुसऱ्याला उद्देशातून केलेले बोलणे म्हणजे अन्योक्ती. ज्याच्याबद्दल काहीच न बोलता, दुसऱ्याला उद्देशातून बोलणे म्हणजे अन्योक्ती. [ उदा - सांबाच्या पिंडीते बसशी खेटुनी वृच्शिका आज परि तो आश्रय सूटता खेटर उतरतील रे तुझा माज

* संसदेह - उपमेय कोणते व उपमान कोणते असा संशय निर्माण होऊन मनाची जी द्विधा अवस्था होते त्या वेळी संसदेह अलंकार होतो. [उदा - हा दोरखंड कि साप ?]

* भ्रांतीमान - उपमानाच्या जागी उपमेयाच आहे भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तिथे भ्रान्तिमान अलंकार होतो.
[उदा - पलाशपुष्प मानोनी शुकचंचू मध्ये अली, तोही जांभूळ मानोनी त्यास चोचीमध्ये भरी]

* व्यतिरेक - उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते. [उदा - अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ]

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.