शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६

क्रियापदाचे काळ

क्रियापदाचे काळ 
काळ - क्रियापदावरून ती क्रिया कोणत्या वेळी घडते याचा जो बोध होतो त्याला ' काळ ' असे म्हणतात.
वर्तमानकाळ - क्रिया आता घडते आहे.
भूतकाळ - क्रिया पूर्वी घडली असा काळ
भविष्यकाळ - क्रिया पुढे घडेल असा बोध

' नाच ' या धातूची सर्व काळातील रूपे
प्रकार        वर्तमानकाळ            भूतकाळ             भविष्यकाळ
साधा         ती नाचते.              ती नाचली.          ती नाचेल.
अपूर्ण         ती नाचत आहे.       ती नाचत होती.    ती नाचत असेल.
पूर्ण            ती नाचली आहे.      ती नाचली होती.   ती नाचली असेल.
रीती          ती नाचत असते.     ती नाचत असे.     ती नाचत जाईल.

* साधा भविष्यकाळ - क्रिया पुढे घडेल असे क्रियापदाच्या रूपावरून कळते. अशोक गाणे गाईल.

* अपूर्ण भविष्यकाळ - एखादी क्रिया भविष्यात पुढे घडत असेल असे समजते.

* पूर्ण भविष्यकाळ - एखादी क्रिया भविष्यकाळात पुढे पूर्ण झाली असेल असे क्रियापादावरून कळते.
उदा - अशोकने गाणे गाईले जाईल.

* रीतीभविष्यकाळ - भविष्यकाळातील एखाद्या गोष्टींची रीत समजते. अशोक गाणे गात जाईल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.